esakal | बारामती : माळेगाव साखर कारखाना दुर्घटनेतील कामगाराचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

बारामती : माळेगाव साखर कारखाना दुर्घटनेतील कामगाराचा मृत्यू

- कामगाराचा आज पहाटे मृत्यू झाला.

बारामती : माळेगाव साखर कारखाना दुर्घटनेतील कामगाराचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

माळेगाव : माळेगाव (ता.बारामती) सहकारी साखर कारखान्यात काल मोठी दुर्घटना घडली. यामध्ये 9 कामगार गुदमरले होते. त्यानंतर आता एका कामगाराचा उपचारादरम्यान पुण्यात आज पहाटे मृत्यू झाला.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

शिवाजी भोसले (वय ५३, खांडज 22 फाटा) असे मृत पावलेल्या कामगाराचे नाव आहे. दरम्यान, माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्याचा यंदाच्या ऊस गळीत हंगाम सांगता झाल्याच्या पार्श्वभूमीवर यंत्रसामग्रीची स्वच्छता होत असताना शनिवारी अपघात झाला होता. एका पॅन टाकीची स्वच्छता करत असताना मिथेन गॅस तयार होऊन 9 कामगार गुदमरले होते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

विशेषत: गंभीर जखमी असलेले कामगार जालिंदर भोसले, घनश्याम निंबाळकर, रामभाऊ येळे यांच्यावरती पुण्यात पुढील वैद्यकीय उपचार सुरू आहेत. तर उर्वरित कामगार बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. जखमींची प्रकृती सुधारत असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

माळेगावच्या जखमी व उपचार घेत असलेल्या कामगारांची नावे पुढील प्रमाणे: रामभाऊ येळे( माळेगाव), जालिंदर भोसले (निरावागज ), राजेंद्र तावरे (सांगवी), सुनील पाटील (टेंभुर्णी), घनश्याम निंबाळकर( माळशिरस), शशिकांत जगताप (पणदरे), शरद तावरे (सांगवी), प्रवीण वाघ (सांगवी).

बारामतीत माळेगाव कारखान्यात दुर्घटना; आठ कामगार टाकीत गुदमरले