माळेगाव कारखान्यातील कामगारांचे पाचव्या दिवशीही उपोषण सुरूच

malegaon.jpg
malegaon.jpg
Updated on

माळेगाव (पुणे) : राज्य शासनाने साखर कामगारांसाठी तयार केलेल्या आकृतीबंधाचा संदर्भ देत माळेगाव साखर कारखान्याच्या मागिल संचालक मंडळाने कामगारांना दिलेली हुद्देवारी सध्याच्या सत्ताधारी संचालक मंडळाने बेकायदेशीररित्या रद्द केली. कारखाना प्रशासनाने शासकिय आदेशाचे उल्लंघन केलेल्या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशा विविध मागण्यांसाठी दोन कामगारांनी उपोषण सुरू केले आहे. कारखाना कार्यस्थळावर सुरू केलेल्या उपोषणकर्त्यांचा आजचा पाचवा दिवस असून नानासाहेब बाबुराव आटोळे (खांडज), गोविंद गोपाळ तावरे (सांगवी) यांचा समावेश आहे. 

माळेगाव कारखान्यामध्ये मागिल सहा महिन्यांपूर्वी सत्तांतर झाले असून येथे राष्ट्रवादी पक्ष पुरस्कृत संचालक मंडळ अस्तित्वात आले आहे. त्यानुसार नविन संचालक मंडळाने अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांच्या नेतृत्वाखाली अलिकडच्या काळात विविध धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. त्यामध्ये मागिल संचालक मंडळाने कामगारांना दिलेली हुद्देवारी रद्द झाल्याचा मुद्दा वादग्रस्त ठरला. त्या प्रकरणाची साखर आयुक्त कार्यालय सत्तरावर चौकशी करून कामगारांना योग्य तो न्याय मिळावा या मागणीसाठी आटोळे व तावरे यांनी गेल्या पाच दिवसांपासून उपोषण सुरू केले आहे.

सध्या उपोषणकर्त्यांची प्रकृती चांगलीच खालावत चालली असून पोलिसांसह वैद्यकिय विभाग सबंधितांवर लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे, माळेगावच्या प्रशासनाने सदरील बाब न्यायप्रविष्ठ असल्याने आम्ही या प्रकरणावर अधिकचे बोलू शकत नाही, असे कळविले.  तर विरोधी आजी माजी संचालकांनी संबंधित उपोषणकर्त्यांच्या मागणीला पाटींबा दिला आहे. उपोषणकर्त्यांच्या मागण्या पुढील प्रमाणे : ४ मे २०२० रोजीच्या ठराव क्रमांक १० च्या संदर्भाने दिलेल्या आदेशाची चौकशी व्हावी,  कारखान्यामध्ये मुळातच सिक्युरिटींची संख्या अधिकची असताना बर्गे लेबर काॅन्ट्रॅक्टर यांना नियमबाह्य सिक्युरिटीचा ठेका देणे, कार्यकारी संचालक यांच्या कार्य़काळातील बेकायदेशीर झालेल्या कामांची चौकशी होणे.  

Big Breaking : पुण्यात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा उच्चांक; एकाच दिवसात 'इतक्या' रुग्णांचा मृत्यू   

उषोणकर्ते नानासाहेब आटोळे म्हणाले, ``माळेगावचे सध्याचे प्रशासन कामगारांच्या मुळावर उठले आहे. त्यांनी राजकारणापायी कामगारांवर अन्याय करू नये. यासंबंधी वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने कामगारांवर झालेला अन्याय दूर केला नाही. त्यामुळे नाइलाजास्तव उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला. ``

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com