कला महाविद्यालयांमध्ये सुरू आहे सरकारचा निषेध

राजकुमार थोरात
Friday, 4 September 2020

राज्यातील कला महाविद्यालयातील प्राध्यपकांनी गेल्या दोन दिवसांपासून सरकारचा निषेध केला जात आहे. त्यानुसार जंक्शन (ता. इंदापूर) येथील भारतीय कला महाविद्यालयामध्ये सरकारचा निषेध करून कला संचालनालय वाचविण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

वालचंदनगर (पुणे) : सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कला महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. नव्याने उदयास येणाऱ्या चित्रकार व शिल्पकारांचे करिअर धोक्यात आले असून, प्रवेशाअभावी महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. राज्यातील कला महाविद्यालयातील प्राध्यपकांनी गेल्या दोन दिवसांपासून सरकारचा निषेध केला जात आहे. त्यानुसार जंक्शन (ता. इंदापूर) येथील भारतीय कला महाविद्यालयामध्ये सरकारचा निषेध करून कला संचालनालय वाचविण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दहावी व बारावी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कला महाविद्यालयामध्ये प्रवेश घेता येतो. कला महाविद्यालयाच्या माध्यमातून कलेतील उच्चशिक्षण घेऊन देशामध्ये अनेक चित्रकार व शिल्पकार तयार झाले आहेत. मात्र, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उदयोन्मुख चित्रकार व शिल्पकारांवर संक्रांत आली आहे. राज्यामध्ये सुमारे १७२ अनुदानित व विनाअनुदानित कला महाविद्यालये आहेत. चित्रकला व शिल्पकला शिक्षणासाठी सन १९६५ पासून कार्यरत असणारे देशातील एकमेव कला संचालनालय आहे.  

पुणे विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेबाबत घेतला मोठा निर्णय

कोरोनामुळे देशातील विद्यालये, महाविद्यालये यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहे. यामध्ये कला महाविद्यलयांचा समावेश आहे. कला महाविद्यालयांनी अंतिम वर्षाचे विद्यार्थी सोडून उर्वरित विद्यार्थ्याच्या वर्षभरातील प्रगतीवरून निकाल तयार करून कला संचालनालयाला पाठवले आहेत. मात्र, संचालनालयाने यावरती कोणतीही कार्यवाही केली नाही. तसेच, नवीन वर्षाचे सत्र सुरु करण्याच्या सुचना देखील दिल्या नाहीत. दहावी व बारावीचे निकाल जाहीर होऊन महिना उलटून गेला आहे. मात्र, कला महाविद्यालयांना नवीन प्रवेशाच्या सुचना दिल्या नाहीत. त्यामुळे नवीन वर्षाचे प्रवेश रखडले असून, महाविद्यालये बंद पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

पुण्यात न्यायालयीन कामकाज 15 सप्टेंबरपर्यंत एकाच शिफ्टमध्ये

राज्य सरकारच्या कलासंचालक या पदावर यापूर्वी चित्रकला व शिल्पकला क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीची नियुक्ती केली जाते. सध्याचे प्रभारी कलासंचालक राजीव मिश्रा हे केवळ आर्किटेक्ट असून, त्यांच्या  प्रभारी नियुक्तीला संपूर्ण कला महाविद्यातील प्राध्यापकांचा विरोध असून, मिश्रा यांना हटविण्याची मागणी राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित महाविद्यालय व शालेय संघटनांनी केली असल्याचे भारतीय कला महाविद्यालयाचे प्राचार्य भरत बोराटे यांनी सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The wrong policy of the government hampered the admission process of the art college