
पुणे : किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दिल्या जाणाऱ्या वसुंधरा मित्र आणि ग्रीन टिचर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा वसुंधरा मित्र पुरस्कार दिल्ली येथील वन्यजीव चित्रपट निर्माते विजय बेदी आणि लेह-लडाख येथील हिमबिबट्याचे संवर्धन करणारे 'शान-ए-शान' यांना तर, ग्रीन टिचर पुरस्कार सोलापूर येथील डॉ. श्रीनिवास वडगबाळकर यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्ष माधव चंद्रचूड आणि महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बायोस्फिअर्सचे डॉ. सचिन पुणेकर, जीवितनदीच्या शैलजा देशपांडे, गिरिप्रेमीचे उमेश झिरपे आणि स्क्वेअरचे नयनीश देशपांडे आणि मयूर वैद्य आदी उपस्थित होते. बालगंधर्व रंगमंदिर आणि प्रभात रस्ता येथील अर्काइव्ह थिएटर येथे 3 ते 7 जानेवारी दरम्यान हा चित्रपटहोत्सव पार पडणार आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी ► क्लिक करा
चंद्रचूड म्हणाले,"विजय बेदी हे बेदी ब्रदर्सच्या तिसऱ्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे ख्यातनाम छायाचित्रकार आणि चित्रपटनिर्माते आहेत. बेदी परिवाराला अनेक वर्षांचा वन्यजीव चित्रपट निर्मितीचा अनुभव आणि वारसा लाभला आहे. शाश्वतऊर्जा, वितळणारे हिमनग, सुसर-मगर यांचे प्रश्न, माकडांची तस्करी, या विषयांवरील चित्रपट हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.'' तसेच, 'शान-ए-शान' हे लेह-लडाख येथील आहेत. लेह लडाखच्या स्थानिक भाषेत शान म्हणजे स्नोलेपर्ड. खेनरब फुनत्सोन्ग, ताशी त्सेरींग, स्मन्ला त्सेरींग यांनी लडाखमध्ये निसर्गसंवर्धनाचे मोठे काम उभे केले आहे. हिमबिबट्यांसह अनेक स्थानिक प्राण्यांची समस्यांपासून सुटका करण्या बरोबरच गावकऱ्यांना यासाठी आवश्यक असे प्रशिक्षण देण्याचे मोठे काम यांनी केले आहे, अशी माहिती चित्राव यांनी दिली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
चित्राव पुढे म्हणाले,"डॉ. वडगबाळकर यांनीरामनदी आणि मुळा-मुठा नदी खोऱ्याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करून त्यांनी संशोधन पत्रिका प्रकाशित केली. याचा मोठा फायदा जलबिरादरीच्या कार्यकर्त्यांना झाला. अग्रणी व माणगंगानदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पात त्यांना तज्ज्ञ म्हणून विशेष आमंत्रित करण्यात आले. महाड, अंबाजोगाई आणि रत्नागिरी विभागांतील पाण्याच्या प्रश्नावर त्यांनी अभ्यास पूर्ण सूचना केल्या. त्यामुळे समस्या सोडविण्यास मोठी मदत झाली.''
अन् भर रस्त्यात मर्सिडीज कार आगीत जळून खाक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.