esakal | लॅक्टिक अॅसिडसाठी लागणाऱ्या किण्वाची पुण्यात होणार निर्मिती; 'प्राज'चा अमेरिकन कंपनीशी करार!
sakal

बोलून बातमी शोधा

Praj

सेंद्रिय पद्धतीने आम्ल तयार करण्यासाठी लायगोसच्या सहकार्याने प्रगत इस्ट प्लॅटफॉर्मही विकसित होत आहे.

लॅक्टिक अॅसिडसाठी लागणाऱ्या किण्वाची पुण्यात होणार निर्मिती; 'प्राज'चा अमेरिकन कंपनीशी करार!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जैवप्रक्रिया उद्योगांसाठी लॅक्‍टीक अॅसिडची मोठी मागणी असते. हे अॅसिड तयार करण्यासाठी लागणाऱ्या किण्वाची निर्मिती प्राज इंडस्ट्रीजच्या वतीने करण्यात येणार आहे. यासाठी अमेरिकेच्या लायगोस कंपनीशी करार करण्यात आला आहे. 

- पुणे : टाऊन प्लॅनिंगमधील 'या' बड्या अधिकाऱ्याच्या घरी 'एसीबी'ची रेड

प्राजचे संस्थापक अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, "कृषी प्रक्रिया उद्योगांसह ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे. सेंद्रिय पद्धतीने आम्ल तयार करण्यासाठी लायगोसच्या सहकार्याने प्रगत इस्ट प्लॅटफॉर्मही विकसित होत आहे. या करारामुळे नूतनीकरणक्षम रसायने आणि द्रव्ये या दोनही क्षेत्रात मोठी संधी निर्माण होणार आहे.''

- पुणेकरांना आता पावसाळ्यातही मिळणार स्वच्छ भाजीपाला-फळे

''शाश्‍वत व सुरक्षित उत्पादनांची मागणी जगभरात सातत्याने वाढत असून या कराराद्वारे आम्ही न्याय देऊ,'' असा विश्वास लायगोसचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक स्टीन यांनी व्यक्त केला.

प्राजने यापूर्वी शर्करायुक्त कच्च्या मालापासून लॅक्‍टीक अॅसिड आणि तत्सम उत्पादने घेतली होती. शेतीमाल, अन्न आणि पेय प्रक्रिया उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणावर याचा वापर होत होता.

आणखी वाचा - काय सांगता! आता मोबाईलवरही करता येणार भाडेकरार

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

loading image