पुणे : संचित रजेवर (पॅरोल) असलेल्या कैद्याकडून ५० हजारांची लाच मागितल्या प्रकरणी येरवडा कारागृहातील हवालदारासह एका महिलेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले.
हवालदार बाजीराव जोतीबा पाटील (वय ५४) याच्यासह ४८ वर्षीय महिले विरोधात येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका कैद्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदार कैद्यास शिक्षा झालेली आहे. त्याला संचित रजा मंजूर करण्यात आली असून सध्या तो कारागृहाबाहेर आहे. खुल्या कारागृहात कैदी शिक्षा भोगत आहे. हवालदार बाजीराव पाटील यांनी कैद्याला ५० हजार रुपयांची लाच मागितली.
लाच न दिल्यास खुल्या कारागृहातून मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात येईल तसेच गैरवर्तणुकीचा अहवाल कारागृह प्रशासनास पाठविण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर पाटील यांनी कैद्याकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली.
तडजोडीअंती कैद्याने १५ हजारांची लाच देण्याचे मान्य केले. कारागृहात कैद्यांसाठी उपाहारगृह आहे. उपाहारगृहातील कर्मचारी महिलेकडे लाचेची रक्कम देण्यास पाटील यांनी सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून पाटील व महिलेस ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त श्रीहरी पाटील आणि पथकाने ही कारवाई केली. पोलीस उपअधीक्षक शीतल घोगरे तपास करत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.