Yerawada jail
Yerawada jailsakal

Pune News : येरवडा कारागृहाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने भूषण पाटील व अभिषेक बलकवडे यांची वेळोवेळी घेतली भेट

येरवडा कारागृहातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मरसाळे याने अमली पदार्थ तस्करी टोळीतील भूषण पाटील व अभिषेक बलकवडे यांची वेळोवेळी भेट घेतली आहे.

पुणे - येरवडा कारागृहातील वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय मरसाळे याने अमली पदार्थ तस्करी टोळीतील भूषण पाटील व अभिषेक बलकवडे यांची वेळोवेळी भेट घेतली आहे. डॉ. मरसाळे याने बलकवडे याला व्हॉट्स ॲप व मोबाईलवर कॉल करून ललित पाटीलला ससून रुग्णालयात उपचार मिळावेत आणि त्याला तेथून पळून जाणे सोयीचे व्हावे यासाठी मदत केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

ललितचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढविण्यासाठी त्याला मदत केल्याच्या आरोपावरून डॉ. मरसाळे याला अटक करण्यात आली आहे. ललितला झालेल्या आजारावर कारागृहात उपचार करणे शक्य होते. मात्र असे असतानाही त्याला ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यासाठी डॉ. मरसाळे याने मदत केली होती. या गुन्ह्यात आतापर्यंत एकूण १४ आरोपींचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

ससून रुग्णालयातील कर्मचारी महेंद्र शेवते (वय ५७, रा. रक्षकनगर, खडकी) याच्यासह कारागृह रक्षक मोईस अहमद शेख (वय ३०, रा. मूळ रा. देगलूर, नांदेड), समुपदेशक सुधाकर सखाराम इंगळे (वय ४४) यांना या गुन्ह्यात नुकतीच अटक करण्यात आली आहे. यांच्याकडे चौकशी केल्यानंतर या गुन्ह्यात डॉ. मरसाळे याचा सहभाग दिसून आला आहे.

डॉ. मरसाळेला गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी -

डॉ. मरसाळे याला सोमवारी (ता. ४) प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते. डॉ. मरसाळे याने अभिषेक बलकवडे, भूषण पाटील, सुधाकर इंगळे यांच्याशी वेळोवेळी मोबाईलवर संपर्क केल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे, अशी माहिती सरकारी वकील वैशाली रेड्डी यांनी न्यायालयात दिली.

गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी डॉ. मरसाळे याला पोलिस कोठडी देण्याची मागणी ॲड. रेड्डी यांनी केली. न्यायालयाने त्याला गुरुवारपर्यंत (ता. ७) पोलिस कोठडी सुनावली आहे. पोलिस निरीक्षक नंदकुमार बिडवई या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com