बारामतीत काल गुरुवार (ता. १७) यादिवशीही कोरोनारुग्णांचे शतक

CoronaVirus
CoronaVirus

बारामती - गेल्या चोवीस तासात बारामतीत 99 रुग्ण पॉझिटीव्ह आले. दरम्यान बुधवारी (ता. 16) प्रतिक्षेत असलेल्या 11 तपासणी अहवालांपैकी 8 जण पॉझिटीव्ह आढळल्याने आज पुन्हा बारामतीचा कोरोनाग्रस्तांचा आकडा 110 वर गेला. बारामतीतील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 2492 इतकी झाली आहे. बरे झालेल्या रुग्णांचा आकडा आज 1230 वर गेला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीत 7 सप्टेंबरपासून लॉकडाऊन सुरु झाले आहे. लॉकडाऊन सुरु होऊन दहा दिवस उलटून गेल्यानंतर परिस्थिती सुधारणा होईल अशी अपेक्षा होती. दोन तीन दिवस आकडे कमी झाल्यासारखे वाटले, पण आज पुन्हा कोरोनाग्रस्तांनी शंभरी पार केली. बुधवारी झालेल्या व्यापक सर्वेक्षणाचे निष्कर्ष दिलासादायक असले तरी कोरोनाग्रस्तांचे दैनंदिन शतक कमी करणेही तितकेच गरजेचे बनत चालले आहे. 

दुसरीकडे नियमित होणारे मृत्यू हाही एक चिंताजनक विषय आहे. आज बारामतीतील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचा आकडा 60 वर जाऊन पोहोचला. शहरापेक्षा तालुक्यातील रुग्णसंख्या झपाट्याने वाढू लागल्याने ही नवीन डोकेदुखी आता प्रशासनापुढे आहे. 

दृष्टीक्षेपात बारामतीचा आढावा
• आजपर्यंतची एकूण रुग्ण संख्या- 2492
• उपचाराखाली असलेले रुग्ण- 1196
• आजपर्यंत कोरोनाने मृत्यूमुखी पडलेले रुग्ण- 60
• पॉझिटीव्ह असलेले मात्र लक्षणे नसलेले रुग्ण- 554
• सौम्य लक्षणे असलेले रुग्ण- 495
• मध्यम लक्षणे असलेले- 71
• ऑक्सिजनवर असलेले रुग्ण- 52
• व्हेंटीलेटरवर असलेले रुग्ण- 24
• बरे झालेले एकूण रुग्ण- 1230

दाखल रुग्णांची दवाखानानिहाय स्थिती खालील प्रमाणे
• रुई ग्रामीण रुग्णालय- 23
• सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय- 72
• शासकीय वैद्यकीय महाविद्यालय- 168
• नटराज नाट्य मंडळ कोविड सेंटर- 80
• नटराज प्रेरणा कोविड सेंटर- 55
• बारामती हॉस्पिटल- 36
• विविध खाजगी रुग्णालय- 82
• घरी विलगीकरणातील रुग्ण संख्या- 771
• पुणे येथे उपचार घेत असलेले रुग्ण- 9

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com