नैराश्यावर योगासन ठरतोय रामबाण उपाय; योगतज्ज्ञ डॉ. महाजन देतायेत ऑनलाईन धडे

मिलिंद संगई
Tuesday, 23 June 2020

बारामतीतील योगतज्ज्ञ डॉ. नीलेश महाजन यांनी लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आजपर्यंत दररोज योगासनांचे धडे ऑनलाईन देण्याचे काम सुरु ठेवले आहे. शारिरीक अंतर राखण्याच्या सूचना असल्याने घरबसल्या योगासनांचे धडे घेण्याशिवाय सर्वांना पर्याय नव्हता. अशा काळात डॉ. महाजन व डॉ. भक्ती महाजन या दांपत्याने मानसिक नैराश्य दूर करण्यासाठी विनामूल्य योगासनांचे धडे देण्यास प्रारंभ केला.

बारामती : लॉकडाऊनच्या काळात अनेकांना कमालीचै नैराश्य आले, भविष्यात नेमके काय होईल याचा अंदाज न आल्याने अनेकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले...अशा काळात एका गोष्टीने अनेकांना मनःशांतीचा अनुभव आला तो म्हणजे योगासनं.....

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

बारामतीतील योगतज्ज्ञ डॉ. नीलेश महाजन यांनी लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आजपर्यंत दररोज योगासनांचे धडे ऑनलाईन देण्याचे काम सुरु ठेवले आहे. शारिरीक अंतर राखण्याच्या सूचना असल्याने घरबसल्या योगासनांचे धडे घेण्याशिवाय सर्वांना पर्याय नव्हता. अशा काळात डॉ. महाजन व डॉ. भक्ती महाजन या दांपत्याने मानसिक नैराश्य दूर करण्यासाठी विनामूल्य योगासनांचे धडे देण्यास प्रारंभ केला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

केवळ बारामतीच नाही तर पुणे, मुंबई, सोलापूर तर एक जण पंजाबमधूनही त्यांच्या या योगासनांच्या धड्यांना उपस्थिती लावतात. मध्यंतरी बारामतीच्या फेरेरो कंपनीत कार्यरत असलेले काही इटालियन नागरिकही महाजन यांच्या योगासनांच्या प्रेमात पडले असून तेही या ऑनलाईन उपक्रमात हजेरी लावतात. 

तीस दिवसांच्या बाळाची झुंज यशस्वी; ससूनमध्ये उपचार

गेल्या बारा वर्षांपासून डॉ. महाजन योगासने शिकवित आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी काम केलेले असून त्यांनी आपले जीवन योगासन या विषयाला वाहिलेले आहे. बारामतीत जीवनविद्या योग आयुर्वेद फाऊंडेशन या नावाने ते योगासनांची एक संस्था चालवितात. योगासनांचा ग्रामीण भागात प्रसार व प्रचार व्हावा या उद्देशाने त्यांचे काम सातत्याने सुरु आहे. 

आंबेगाव तालुक्यातील 'या' भागात सापडले 2 कोरोना पॉझिटिव्ह

मानसिक स्वास्थ्य संवर्धन गरजेचे....
लॉकडाऊन इतका लांबेल असे कोणालाच वाटले नव्हते, व्यवहार ठप्प झाल्याने त्याचा मानसिक आघात मोठा आहे. अनेकांना निराशेने ग्रासले आहे, अशा काळात मनःस्वास्थ्य टिकवून ठेवणे गरजेचे आहे. योगासनांच्या मदतीने लोकांनी शरीरासोबतच मनःशांतीचाही अनुभव घेतला. या काळात अनेकांना योगासनांची गोडी लागली, ही बाब महत्वाची वाटते
- डॉ. नीलेश महाजन, बारामती
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yoga asanas are remedy for depression