esakal | योग विद्येच्या शिक्षणाकरिता बारामतीत मिळणार ही सुविधा
sakal

बोलून बातमी शोधा

yoga

महाराष्ट्र शासनाच्या व विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) मान्यताप्राप्त कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाशी संलग्न योग महाविद्यालय यंदाच्या वर्षापासून बारामतीत सुरु होणार आहे.

योग विद्येच्या शिक्षणाकरिता बारामतीत मिळणार ही सुविधा

sakal_logo
By
मिलिंद संगई

बारामती (पुणे) : महाराष्ट्र शासनाच्या व विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) मान्यताप्राप्त कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाशी संलग्न योग महाविद्यालय यंदाच्या वर्षापासून बारामतीत सुरु होणार आहे. या उपक्रमाचे प्रमुख डॉ. नीलेश महाजन, भक्ती महाजन व डॉ. अनिल मोकाशी यांनी याबाबत माहिती दिली. 

खडकवासला प्रकल्पात निम्म्याहून कमी साठा

बारामतीतील या योग महाविद्यालयात योगशास्त्र विषयातील बी.ए. (योग) व एम.ए. (योग) हे अभ्यासक्रम असतील. बारामतीतील जीवनविद्या योग आयुर्वेद फाउंडेशन व इन्स्टिट्यूट ऑफ रूरल पेडियाट्रीक (बाल कल्याण केंद्र) यांच्यावतीने हे अभ्यासक्रम चालविले जातील. हे अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विविध हॉस्पिटल्स, आरोग्य केंद्र, जिम किंवा पंचतारांकित हॉटेलमध्ये योगशिक्षक म्हणून नियुक्ती होऊ शकते किंवा स्वतःचा योग वर्ग, योग स्टुडिओ सुरू करता येईल. 

बारामतीत कोरोनाचा बारावा बळी

आरोग्य टिकविण्यासाठी व निरामय जीवन जगण्यासाठी आजच्या आधुनिक युगामध्ये योगसाधनेची नितांत आवश्यकता आहे, योगशास्त्राचा उपयोग शारीरिक, मानसिक व अध्यात्मिक स्तरावर आहे. त्यामुळे त्याचा सखोल व सर्वांगीण सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे, त्यासाठी अशा प्रकारचा अभ्यासक्रम सुरु केला आहे, अशी माहिती डॉ. अनिल मोकाशी यांनी दिली. 

पुण्याच्या आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

योगशास्त्र हे केवळ आसनापुरतेच मर्यादित नाही. आसनांच्या पलीकडेही अनेक बाबी आहेत. बारामतीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे योग शिक्षण मिळावे व त्या द्वारे उत्तम योग शिक्षक तयार होऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी काम करावे, यासाठी योग महाविद्यालय सुरु केल्याचे योगाचार्य डॉ. नीलेश महाजन यांनी नमूद केले. केंद्र सरकारच्या नव्याने येऊ घातलेल्या शैक्षणिक धोरणामध्ये योग विषयाचा समावेश करण्यात येणार आहे त्यामुळे विविध शाळा आणि महाविद्यालयांमध्ये योगअध्यापक म्हणून नियुक्ती होऊ शकते, अशी माहिती योगतज्ज्ञ डॉ भक्ती महाजन यांनी दिली.

आज संपूर्ण जग योगशास्त्राकडे चिकित्साशास्त्र म्हणून पाहू लागले आहे. त्यामुळे भारतीय योगशास्त्राची मागणी प्रचंड वाढली आहे. भारतीय संस्कृतीविषयी पाश्चात्त्य देशांमध्ये प्रचंड कुतूहल आहे. त्यातील विषय, विज्ञान, तत्वज्ञान याविषयी त्यांना आवड आहे. त्यामुळेच भारतीय शास्त्रांची सांगोपांग माहिती असणार याची निकड भासू लागली आहे. त्यातून योग विद्या शास्त्र, वेदशास्त्र, संस्कृत पंडित यांची मागणी वाढतीच राहणार आहे.