Video : मी सक्तीच्या रजेवर हे मला माध्यमांतूनच कळले : योगेश सोमण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

मला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले हे मला माध्यमांतूनच कळले. मी स्वतःहुन रजा घेतली की सक्तीच्या रजेवर आहे, हे मी समितीसमोर सांगेन.  विद्यापीठाने अधिकृतपणे काहीही कळवले नाही. मी माझ्या विचारांवर ठाम आहे. मी सावरकरांबाबत विचार मांडले होते. असहिष्णुता ही त्यांच्याबाबत आहे, असेही मत सोमण यांनी यावेळी मांडले. 

पुणे : मुंबई विद्यापीठाने सक्तीच्या रजेवर पाठविलेले नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख योगेश सोमण यांनी अखेर मौन सोडले. माझ्या रजेबाबत मी काही बोलणार नाही. मी माझं अधिकृत म्हणणं सत्यशोधन समितीसमोरच मांडेल असे त्यांनी यावेळी सांगितले. पुण्यातील माध्यमांशी ते संवाद साधत होते.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मला सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले हे मला माध्यमांतूनच कळले. मी स्वतःहुन रजा घेतली की सक्तीच्या रजेवर आहे, हे मी समितीसमोर सांगेन.  विद्यापीठाने अधिकृतपणे काहीही कळवले नाही. मी माझ्या विचारांवर ठाम आहे. मी सावरकरांबाबत विचार मांडले होते. असहिष्णुता ही त्यांच्याबाबत आहे, असेही मत सोमण यांनी यावेळी मांडले. 

गांधींवर टीका केली अन् योगेश सोमणांना पाठविले सक्तीच्या रजेवर

कोणाचेही संबंध व्यक्तींसोबत असतात, पक्षासोबत नाहीत. जर गृहमंत्र्यांनी त्यांच्या मतदारसंघात अभिनय शिकवायला बोलावलं तरीही मी जाईन. व्यक्त होताना मी कोणाला विचारलं नव्हतं, त्यामुळे उत्तरही मीच देईन.सत्ताकारण राजकारण यापेक्षा वेगळं जाऊन मी विचार मांडले त्यामुळे या प्रकरणात पाठींब्यासाठी कोणी हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा कशी ठेऊ, असा सवाल त्यांनी यावेळी केला. 

योगेश सोमण रजेवर की सक्तीच्या रजेवर ? पुन्हा वाद उफाळणार?

मुंबई विद्यापीठाचे थिएटर ऑफ आर्टसचे संचालक योगेश सोमण यांना विद्यापीठाने अचानक सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर केलेल्या टीकेमुळे त्यांना या सक्तीच्या रजेला तोंड द्यावे लागत आहे. योगेश सोमण यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यात राहुल गांधी व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली होती. या टीकेमुळेच त्यांच्यावर ही कारवाई केली गेली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yogesh Soman speaks about his leave in front of Media