मुलांचा ताबा हवा असेल तर पोटगी भरा; थकलेली पोटगी मिळण्यासाठी अनोखी शक्कल

सनील गाडेकर
Tuesday, 27 October 2020

'कोरोनाच्या संकटामुळे मला एप्रिलपासून पत्नीला पोटगी देता आलेली नाही. त्यापूर्वी मी न चुकता सर्व रक्कम देत होतो. दिवाळीत मुलाचा ताबा मिळावा म्हणून मी अर्ज केला आहे. मात्र आधी पोटगीची रक्कम भरा तरच मुलाला भेटू देईल,'' अशी अट पत्नीने घातल्याचे शेखर यांनी सांगितले.

पुणे - 'कोरोनाच्या संकटामुळे मला एप्रिलपासून पत्नीला पोटगी देता आलेली नाही. त्यापूर्वी मी न चुकता सर्व रक्कम देत होतो. दिवाळीत मुलाचा ताबा मिळावा म्हणून मी अर्ज केला आहे. मात्र आधी पोटगीची रक्कम भरा तरच मुलाला भेटू देईल,' अशी अट पत्नीने घातल्याचे शेखर यांनी सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शेखर यांची पत्नी पूजा (सर्व नावे बदललेली) यांची गुजराण पोटगीवर अवलंबून आहे. शेखर हे पगारातून मिळणारे पैसे पूजा यांना पोटगी म्हणून देत. मात्र कोरोनामुळे त्यांची नोकरी गेली आहे. त्यामुळे त्यांना काही महिन्यांची पोटगी देता आलेली नाही. दिवाळी सुटीनिमित्त मुलांचा ताबा देण्यावरून शेखर आणि पूजा यांच्याप्रमाणे अनेक जोडप्यांत सध्या वाद सुरू झाले आहेत. पोटगीवर सर्व खर्च अवलंबून असलेल्या मात्र ती न मिळालेल्या महिलांचे कोरोनाकाळात मोठे आर्थिक हाल झाले आहेत. त्यामुळे किमान मुलांच्या ताब्याच्या निमित्ताने का होईना पोटगी मिळेल, अशी आशा त्या बाळगून आहेत. मुलांचा ताबा असलेले पालक मुद्दाम मुलांना पाठवत नसल्याचे प्रकार देखील घडले आहेत. तर कोरोनापुर्वी नियमित पोटगी भरणा-या अनेकांना सध्याच्या परिस्थितीमुळे पत्नीला रक्कम देणे मुश्‍कील झाले आहे.

'दोन नंबर संस्कृती' ही कोरोनापेक्षा भयानक; बाबा आढावांची खरमरीत टीका

सर्व नियम मीच पाळायचे का?
न्यायालयाचे आदेश असतील तर मुलांचा ताबा असलेले पालक दुस-या पालकाला मुलांना भेटू देतात. मात्र ताबा नसलेल्या पालकाने त्याच्या जबाबदा-या पाळल्या नाही तर त्यांच्यात वाद होतात. जोडप्यातील एखादी व्यक्ती न्यायालयाच्या आदेशांचे पालक करीत नसेल तर सर्व नियम मीच पाळायचे का? असा प्रश्‍न दुसरी व्यक्ती उपस्थित करते.

अकरावी ॲडमिशन: दीड महिन्यांपासून रखडलेली प्रक्रिया तत्काळ चालू करा; अभाविपचं आंदोलन

कोरोनामुळे आलेल्या सर्व प्रकारच्या संकटांवर आपण वेगवेगळ्या पद्धतीने मार्ग काढले आहेत. त्यामुळे मुलांची भेट किंवा पोटगी मिळण्याच्या समस्येवर जोडप्याने कोणतीही अडवणूक न करता समजूतदारपणा दाखवावा. प्रत्यक्ष भेटता येत नसेल तर व्हिडिओ कॉलवर बोलावे. पतीने पोटगी दिली नाही म्हणून पत्नीने मुलांच्या भेटीच्या निमित्ताने मुद्दाम त्याची अडवणूक करणे चांगले नाही. किंवा इतर कोणत्याही कारणाने होणा-या अडवणुकीचा उद्देश काय आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे.
- अनघा काळे, कौटुंबिक न्यायालयातील वकील

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: you want custody of the children pay alimony