water-k.jpg
water-k.jpg

बायकोसोबत तो मासे पकडायला गेला अन्...

पाटस : कानगाव (ता. दौंड) येथे भिमा नदीपात्रात मासे पकडताना पाण्यात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह तब्बल ४५ तासांनी मृतदेह सापडला. भारत पितांबर वाघमारे (वय ३५) रा. मांडवगण फराटा ता. शिरुर जि. पुणे) असे मृत तरुणाचे नाव आहे.

कानगावपासून पाच किलोमीटर अंतरावरील शिरुर तालुक्यातील गणेगाव दुमाला हद्दीतील नदीपात्रात हा मृतदेह आढळून आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी पाण्यातून तो बाहेर काढला.

मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी भारत वाघमारे हा पत्नीसह कानगाव हद्दीतील भिमा नदीपात्रात मासे पकडण्यासाठी गेला होता. त्या वेळी भारत अचानक पाण्यात पडला. पत्नीने आरडा-ओरडा करताच परीसरातील नागरीकांनी नदीकडे धाव घेतली. मात्र, नदीचा प्रवाह वेगात असल्याने काही वेळातच तो पाण्यात दिसेनासा झाला.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

माहीती मिळताच पाटस पोलिस पथक व महसूल पथकाने घटनास्थळी आले. दोन दिवस संबधित तरुणाचा शोध सुरु होता. शनिवारी (ता. ११) रात्री पोलिस नाइक घनशाम चव्हाण, संतोष मदने यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने बोटीतून नदीपात्रात भारतचा शोध घेतला. मात्र काहीच पत्ता लागला नाही. आज रविवारी सकाळी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन पथकास पाचारण करण्यात आले.

कानगाव हद्दीतील बंधाऱयापासून पथकाने पाण्यात मृतदेहाचे शोध कार्य सुरु केले. अखेर दुपारी पाच किलोमीटर अंतरावर शिरुर तालुक्यातील गणेगाव दुमाला हद्दीतील भिमा नदीपात्रात एक अनओळखी मृतदेह असल्याचा काहींच्या निदर्शनास आला. याबाबत लोकांनी पथकाला माहीती दिली. दुपारी दौंड महसुल पथकाचे मंडलअधिकारी राजेंद्र म्हस्के, तलाठी शंकर दिवेकर, रविंद्र फणसे आदी कर्मचाऱयांनी संबधीत ठिकाणी धाव घेतली.

यावेळी आपत्ती व्यवस्थापनच्या पथकाने मृतदेह नदीतुन बाहेर काढला. तो भारत वाघमारे याचा असल्याची ओळख पटली. याबाबत महसुल विभागाने मांडवगण पोलिसांना माहीती दिली. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com