बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Leopard Attack

बाजरी पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या ओंकार दिलीप टेमगिरे (वय-१७) याच्यावर जीवघेना हल्ला केला.

बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी

निरगुडसर - बाजरी पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने (Leopard) शेताला पाणी देण्यासाठी गेलेल्या ओंकार दिलीप टेमगिरे (वय-१७) याच्यावर जीवघेना हल्ला (Attack) केला. बिबट्याने हल्ला केल्यानतर ओंकार याने प्रतिकार करत आरडाओरड केला आणि जीव वाचला. ही घटना थोरांदळे (ता.आंबेगाव ) येथील डोंगरमळ्यात बुधवार ता. ११ रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

मंचर ते बेल्हे रस्त्यावर थोरांदळे गावाच्या अलीकडे डोंगरमळा असून, येथील तरुण ओंकार दिलीप टेमगिरे हा बुधवारी (दि .११ ) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास बाजरी पिकाला पाणी भरण्यासाठी गेला होता. त्यावेळी बारे सुरू करण्यासाठी तो वाकला असता बाजरी पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्याने ओंकार टेमगिरे घाबरला अशातच प्रतिकार करत त्याने आरडाओरडा केला. त्यावेळी शेजारी असलेले योगेश पोपट टेमगिरे हेही तेथे धावत आले. तोपर्यंत बिबट्याने तेथून उसाच्या शेतात धूम ठोकली होती.

आरडाओरडा केल्याने ओंकारचा जीव वाचला. योगेश टेमगिरे यांनी वनविभागाला ही माहिती दिल्यानंतर वनरक्षक पूजा पवार, महेश टेमगिरे, योगेश टेमगिरे यांनी जखमी ओंकार टेमगिरे याला मंचर येथील ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. ओंकारच्या कपाळाला, हाताला व पायाला जखमा झाल्या आहेत .

घडलेल्या घटनेमुळे थोरांदळे, डोंगरमळा परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान डोंगरमळा परिसरातील शेतकऱ्यांनी एकट्याने फिरू नये. सावधगिरी बाळगावी. रात्रीच्या वेळी घरातच थांबावे. असे आवाहन वनरक्षक पूजा पवार यांनी केले आहे.

Web Title: Young Man Injured In Leopard Attack

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :attackLeopardYoung Man
go to top