Leopard Attack : पिंपळवंडी येथील तरुण बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला

बॅटरीचा उजेड हा भितींवर बसलेल्या बिबट्यावर पडला त्यानंतर बिबट्याने अचानक माझ्या समोर झेप घेतली असता मी वेगाने ओरडत घराच्या दिशेने पळालो
Young Man Narrowly Escapes Leopard Attack in pimpalwandi junnar
Young Man Narrowly Escapes Leopard Attack in pimpalwandi junnarSakal

पिंपळवंडी : येथील प्रदीप गंगाराम माळी(वय १९)हा तरुण बिबट्याच्या हल्ल्यातून थोडक्यात बचावला.हि घटना मंगळवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडली. पिंपळवंडीच्या (ता.जुन्नर) सरकारी पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ असलेल्या सार्वजनिक शौचालयात प्रदीप माळी हा मंगळवारी(ता.१९) रात्री साडेनऊच्या दरम्याम जात असताना शौचालयाच्या भितींवर बसलेल्या बिबट्याने प्रदीपवर झेप घेतली यात प्रदीपने प्रसंगावधान दाखवल्याने तो या हल्ल्यातून थोडक्यात बचावला.

प्रदीपने सांगितले की माझ्या हातात असलेल्या बॅटरीचा उजेड हा भितींवर बसलेल्या बिबट्यावर पडला त्यानंतर बिबट्याने अचानक माझ्या समोर झेप घेतली असता मी वेगाने ओरडत घराच्या दिशेने पळालो, पळत असताना एका ठिकाणी पडलो त्यानंतर पुन्हा उठुन पळालो बिबट्या माझ्या पाठीमागेच येत होता.

माझ्या ओरडण्याच्या आवाजाने माझी आई व घरातील सदस्य बाहेर आले.त्यांनी देखील मोठ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथुन पळ काढला.अगदी घराच्या जवळ बिबट्याने पाठलाग केला दैव बलवत्तर म्हणुन मी वाचलो.

येथे असलेल्या सार्वजनिक शौचालयाच्या पाठीमागे गावठाणातील कचरा टाकत असल्याने याठिकाणी अनेक भटकी कुत्री येत असतात त्यांना पकडण्यासाठी बिबटे देखील येथे फिरत असतात.या परिसरात अनेकदा नागरिकांना बिबट्यांचे दर्शन झालेले आहे. या शौचालयाचा वापर गावातील अनेक कुटुंब करत असतात येथे विजेच्या दिव्याचा खांब बसविण्यात यावा तसेच येथील बिबट्याला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com