Corona Virus : पुण्यात वृद्धांच्या मदतीसाठी धावतेय तरुणाई

Young people are running to help the elders in Pune during Corona virus  Breakdown
Young people are running to help the elders in Pune during Corona virus Breakdown

पुणे : कोरोनामुळे जनजीवन गप्प झाले असताना पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एकटे राहणारे वृद्ध नागरिकांचे काय असा प्रश्न नक्कीच आहे. पण त्यांच्या मदतीसाठी तरुणाईचा एक समूह अगदी शांतपणे मदतीचे काम करत आहे. 

पुण्यात किराणा दुकाने सुरू रहाणार; गर्दी न करण्याचे आवाहन 
पुण्यातीलच असलेल्या गौरी फाळके आणि सोनाली रसाळ या दोन संवेदनशील आर्किटेक्ट तरुणींच्या मनात प्रथम वृद्ध नागरिकांच्या गरजांची समस्या आली. त्यानंतर त्यांच्यासाठी काहीतरी करावे म्हणून त्यांनी एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला. त्याची लिंक अन्य समाज माध्यमांवर व्हायरल केली आणि ज्येष्ठ नागरिकांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी केले. हा व्हायरल मेसेज वाचल्यानंतर असंख्य तरुण तरुणी त्यांना जोडले गेले आणि वृद्ध नागरिकांच्या काही गरजा पूर्ण होऊ लागल्या आहेत. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 
गौरी फाळके याबाबत सकाळची बोलताना म्हणाल्या, "कोरोनामुळे सगळ्याच जनजीवनावर परिणाम झाला असताना यात पुण्यात एकटी राहणारी ज्येष्ठ नागरिक हे तरी कसे बाजूला राहतील? त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. आता गृहिणीपासून ते नोकरी करणाऱ्या नागरिकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपासून ते सरकारी यंत्रणेतील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वजण या मोहिमेला हातभार लावत आहेत."

हेही वाचा : पुणे विद्यापीठातील केंद्राला 'नॅशनल रिसोर्स सेंटर'चे नामांकन
पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन भागात वृद्ध नागरिकांना जेवण, औषधे किराणा आणि वैद्यकीय मदत देण्याचे काम सुरू केले आहे. यात आतापर्यंत जवळपास दोनशेहून अधिक स्वयंसेवक काम करत आहेत. कोरोना आजाराचा प्रादुर्भाव होऊ लागल्यानंतर 18 मार्च रोजी आम्ही या पद्धतीच्या ग्रुपचा विचार केला होता. प्रत्यक्ष मदत 21 तारखेपासून सुरू झाली. आता शंभरहून अधिक वृद्ध दांपत्यांपर्यंत मदत पोचविण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत, असे त्यांनी सांगितले.

"अनेक ज्येष्ठ नागरिकांचे आम्हाला फोन येत असून त्यांना मदतीची गरज असल्याचे सांगत आहेत. यातील अनेक वृद्धांची मुले-मुली परदेशात आहेत. यातील अनेकांना वयामुळे किंवा आजारामुळे घराबाहेर पडता येत नाही. अशा परिस्थितीत त्यांना मदत करण्याचे काम स्वयंसेवक मनापासून करीत आहेत. ज्येष्ठ नागरिकही या सेवेबद्दल समाधानी आहेत. अजूनही अनेक ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचावी लागणार आहे. व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून आम्ही ज्येष्ठ नागरिकांशी जोडलो गेलो असलो तरी अनेक नागरिकांची गरज पूर्ण होण्यासाठी स्वयंसेवकांना पुढे यावे लागेल. आमच्या स्वयंसेवकांमार्फत त्यांना मदत पोहोचली जातच आहे; त्याबरोबरच ज्येष्ठ नागरिक राहत असलेल्या भागात मेडिकल, वैद्यकीय सेवा, जेवणाचे डबे पोहोचविणारे व्यवसायिक असतात. त्यांच्याबरोबरही आम्ही संवाद साधत आहोत. त्यांना ज्येष्ठ नागरिकांशी जोडून त्यांच्या गरजाही भागवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जेष्ठांना ज्यांना मदत करायची आहे, त्यांनी पुढे यावे," असे आवाहन फाळके यांनी केले आहे.

Corona Virus : पुण्यात आता 'या' खासगी लॅबमध्ये होणार कोरोनाची चाचणी

खासगी कंपनीत नोकरी करते. या परिस्थितीत अनेक ज्येष्ठ नागरिकांना मदतीची गरज आहे. त्यांना मदत करणे मला माझे कर्तव्य वाटते आणि आजी आजोबांची सेवा केल्याचा आनंदही मिळतो. म्हणून स्वत:हून या कामाशी जोडून घेतले आहे.
- रेखा देवडिगा (स्वयंसेवक)

जेष्ठ नागरिकांनी या क्रमांकावर संपर्क करावा : 9822981267 (गौरी फाळके)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com