

Pune Snake Rescuer Succumbs to Snakebite While Saving Reptile
esakal
लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील थेऊर येथील २१ वर्षीय तरुण सर्पमित्राचा साप पकडत असताना साप चावून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सदर घटना कोलवडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत सोमवार (२५ मे) रोजी सायंकाळी घडली आहे. या घटनेत दिपक संतोष जाधव (वय २१, रा. सिद्धेश्वर मंदिर रोड, काळे वस्ती, थेऊर. ता. हवेली) या सर्पमित्राचा मृत्यू झाला आहे.