पुण्यात युवा भीम सेनेतर्फे तिरंगा मास्क न वापरण्याचे आवाहन             

mas.jpg
mas.jpg

खडकी बाजार : पंधरा ऑगस्ट निमित्त पुणे शहरात काही ठिकाणी तिरंगा असलेले मास्क तयार करून ते विक्री करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर हा मास्क नसून भारत देशाचा तिरंगा झेंडा आहे. हा मास्क कोणीही वापरू नये, विकत घेऊ नये, असे आवाहन युवा भीम सेनेच्या वतीने करण्यात आले आहे. 

त्याचप्रमाणे याबाबत पुणे शहर पोलिस आयुक्त यांना निवेदन देणार आहे, अशी माहिती युवा भीम सेनेच्या कार्यकर्त्यांनी दिली आहे. हे असे मास्क कोणीही वापरू नये असे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

ज्या तिरंग्यासाठी आज भारताच्या सीमेवर आपले जवान आपले प्राण देत आहेत आणि याच तिरंग्याचे मास्क बनवणे म्हणजे लज्जास्पद आहे. असे युवा भीम सेना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमीर शेख, पुणे जिल्हाध्यक्ष गणेश दुनाने, शुभम डावरे, आनंद साळुंखे, मयूर कदम, सुमन घोलप यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com