esakal | तरुणाईला मराठीपेक्षा इंग्रजी जवळची
sakal

बोलून बातमी शोधा

English-Marathi

मुले मराठीपासून दुरावण्याची काही कारणे 

  • शाळेतील इंग्रजी ही श्रेष्ठ आणि घरी बोलली जाणारी मराठी दुय्यम या विचारसरणीमुळे मातृभाषेला कमी लेखले जाते.
  • शुल्क जास्त असल्याने इंग्रजी माध्यमांच्या शाळा मोठ्या, असे गृहीत धरले जाते.
  • पालक, शिक्षक यांचा भाषेविषयीचा दृष्टिकोन मुलांवर दीर्घकाळ परिणाम करतो. 
  • इंग्रजी बोलणे, मराठी बोलताना इंग्रजी शब्दांचा वापर करणे हा आपल्या प्रतिष्ठेचा भाग आहे, असा मुलांचा समज होतो.

जनजागृतीमुळे भविष्य उज्ज्वल
सध्या मातृभाषेच्या जनजागृतीवर मोठ्या प्रमाणात काम केले जात आहे. मुलांना मराठी भाषेचे महत्त्व नेमके काय आहे, याची जाणीव करून दिली जात आहे, त्यामुळे येत्या २० ते २५ वर्षांमध्ये मराठीचे भविष्य उज्ज्वल असेल, असा आशावाद प्र. ना. परांजपे यांनी व्यक्त केला.

तरुणाईला मराठीपेक्षा इंग्रजी जवळची

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - आपल्या पाल्याला इंग्रजीत शिक्षण मिळावे यासाठी सध्या पालकवर्ग इंग्रजी माध्यमाच्या शाळेची निवड करतात. इतकेच नाही, तर घरातसुद्धा आपल्या मुलांसोबत बोलताना इंग्रजीचा अधिक आणि मातृभाषेचा वापर कमी करतात. यामुळे सध्याच्या तरुणाईला वाटते की इंग्रजी भाषा मराठी भाषेच्या तुलनेत जास्त महत्त्वपूर्ण आहे, असे मत ज्येष्ठ भाषा अभ्यासक प्रा. प्र. ना. परांजपे यांनी मराठी भाषा दिनानिमित्त विशेष मुलाखतीत व्यक्त केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मराठी बोलताना सध्याच्या पिढीला का अडचण येते, असा प्रश्‍न विचारता प्रा. परांजपे म्हणाले, ‘‘मराठी बोलणे आणि मराठी वाचणे यामध्ये फरक आहे. मुळात संपूर्ण शिक्षण हे इंग्रजी माध्यमातून झाल्यामुळे, तसेच इंग्रजी पुस्तकांशी अधिक संबंध असल्यामुळे त्यांना मराठी भाषेतील शब्दांची माहिती जास्त नसते, त्यामुळे नेमका एखाद्या शब्दाचा अर्थ काय आहे व त्यांचा योग्य तो वापर कसा करावा याची माहिती नसते.

मराठी राजभाषा दिन : मराठी माध्यमातून 'यूपीएससी'ला सामोरे जाताना...

शाळेत किंवा महाविद्यालयात शिक्षण पूर्ण करताना, संवाद साधताना इंग्रजी शब्दांचा वापर करण्यावर अधिक भर दिला जातो. या मानसिकतेमुळे आज मराठी भाषेचा वापर करताना तरुणाईला अडथळे जाणवतात.’

मायबोलीला विसरणार नाही...

loading image