कोंढवळ येथील धबधब्यात पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यु

कोंढवळ (ता. आंबेगाव) येथील धबधब्यात सोन्या लाहारे या पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यु झाला.
Kondhwal Waterfall
Kondhwal WaterfallSakal

घोडेगाव - कोंढवळ (ता. आंबेगाव) (Kondhwal) येथील धबधब्यात (Waterfall) सोन्या लाहारे या पर्यटकाचा पाण्यात बुडून मृत्यु (Drown Death) झाला. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविक, पर्यटक यांना बंदी आहे. पर्यटकांनी या ठिकाणी येऊ नये यासाठी घोडेगाव पोलीसांचे (Police) चेकनाके असताना देखील भाविक, पर्यटक येथे कसे फिरतात? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. (Youth Death in Kondhwal Waterfall Drown)

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, आहुपे, पाटण खो-यामध्ये आठ दिवसांपासुन पावसाच्या अधुन मधुन जोरदार सरी पडत असल्यामुळे पर्यटकांची या भागात गर्दी वाढली आहे. भीमाशंकर पासुन तीन किलोमिटर अंतरावर असणा-या कोंढवळ येथील धबधबा पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे. आज (दि. १७) रोजी सकाळी १० चे सुमारास चार-पाच जण कोंढवळ धबधबा पाहण्यासाठी आले होते. यातील सोन्या बापु लाहारे (वय- २९) सध्या रा. शिक्रापुर ता. शिरूर. मुळ गाव राहता (अहमदनगर) याचा धबधब्यात पाय घसरून मृत्यु झाला असुन स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोधण्याचे काम सुरू आहे. तहसिलदार रमा जोशी यांनी एन. डी. आर. एफ ला पाचारण केले आहे.

Kondhwal Waterfall
पुणे : विद्यापीठाची द्वितीय सत्र परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार

कोंढवळ धबधब्याकडे जाण्यासाठी एकमेव मार्ग हा पालखेवाडी चेक नाक्यावरून आहे. तरीही येथुन पुढे भाविक, पर्यटक कसे येतात, संबंधित सोन्या लाहारे व त्यांच्या मित्रांना चेक नाक्यावरच अडविले असते तर ही दुर्घटना घडली नसती. या चेक नाक्यांवर काही भाविक, पर्यटकांना मागे पाठविले जाते तर बहुतेक जणांना निसर्गाचा आनंद घेण्यासाठी सोडले जाते. आजची घटना यामुळेच घातली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com