बाप रे, काही कळायच्या आतच चौघांच्या अंगावर आली गाडी..

राजकुमार थोरात
Saturday, 5 September 2020

 चौघे मित्र रात्री सव्वासात वाजण्याच्या सुमारास अशोकनगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगच्या बंद घरासमोर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी कार चालक हा वालचंदनगर- कळंब रस्त्यावरुन गाडी वळवून अशोकनगरच्या रस्त्याने चालला होता. 

वालचंदनगर (पुणे) : कार चालकाला ब्रेक दाबायचा होता, मात्र चुकून ब्रेकऐवजी पाय अॅक्सीलेटरवर पडला. त्यामुळे गाडीचा वेग वाढून झालेल्या अपघातामध्ये युवकाचा मृत्यू झाला. प्रसंगवधान राखून तीन जण पळाल्याने त्यांचा जीव वाचला.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

वालचंदनगरजवळील अशोनगरमध्ये शुक्रवारी (ता. ४) अपघाताची ही घटना घडली. या अपघामध्ये गणेश अविनाश लाळगे (वय ३२) या युवकाचा मृत्यू झाला आहे. स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश याच्यासह प्रशांत बनसोडे, राजेश खंडागळे सागर ढोबळे हे चौघे मित्र रात्री सव्वासात वाजण्याच्या सुमारास अशोकनगरकडे जाणाऱ्या रस्त्यालगच्या बंद घरासमोर गप्पा मारत बसले होते. त्यावेळी कार चालक हा वालचंदनगर- कळंब रस्त्यावरुन गाडी वळवून अशोकनगरच्या रस्त्याने चालला होता. 

अबब! पुणे जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्यांना ठोठावला तब्बल सव्वा कोटींचा दंड​

यावेळी गाडीचा वेग कमी करण्यासाठी त्याने ब्रेक दाबला, मात्र पाय चुकून ब्रेकऐवजी अॅक्सीलेटरवर पडला. त्यामुळे अचानक गाडीचा वेग वाढला. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. गाडीने रस्ता सोडून रसत्याच्या बाजूला असलेल्या घराकडे वळून गणेशच्या अंगावर गाडी गेली. त्यात त्याला गंभीर मार लागला. त्यामुळे त्याला बारामतीमधील खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, उपचार सुरु असताना आज (ता. ५) पहाटे त्याचा मृत्यू झाला. अपघातावेळी प्रसंगावधान राखून तिघे जण पळाल्याने त्यांचा जीव वाचला. याप्रकरणी आज उशिरापर्यंत वालचंदनगर पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली नव्हती.

प्रत्यक्ष अपघात पाहणाऱ्या व गप्पा मारत बसलेल्या मित्रांपैकी प्रशांत बनसोडे यांनी सांगितले की, काही कळायच्या आतच गाडी अचानक आमच्या दिशेन येऊ लागली. आम्ही उजवीकडे पळालो व गणेश डावीकडे पळाला. गणेशला गाडीचा जोराचा धक्का लागला होता. अपघात झाला तरीही चालकाचा पाय अॅक्सीलेटरवर होता. गाडी घराच्या भिंतीला धडकून दोन वेळा पाठीमागे आली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth dies in accident at Walchandnagar