#बेरोजगारी तरुणाईने स्वयंरोजगाराकडे वळावे - डॉ. विजय भटकर 

#बेरोजगारी तरुणाईने स्वयंरोजगाराकडे वळावे - डॉ. विजय भटकर 

जागतिकीकरण, उदारीकरणामुळे प्रगती झाली आहे. राष्ट्राचे उत्पादन वाढले, विकास झालेला आहे. पण विषमता वाढलेली आहे. त्यातून समाजात अस्वस्थता निर्माण होते आहे. पूर्वी संगणक आल्यानंतर नोकऱ्या कमी होतील, असे वाटले होते. पण प्रचंड नोकऱ्या वाढल्या, माहिती-तंत्रज्ञान क्षेत्राचा विस्तार झाला आहे. आज रोबोटिक्‍स, कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्र खुली झाली आहेत. त्यामुळे नोकऱ्या तयार होत नाहीत. बहुतांश कामे यंत्रे करू लागली आहेत. पुढेही पारंपरिक पद्धतीने नोकऱ्या तयार होणार नाहीत. म्हणून वेगळ्या प्रकारच्या क्षमता निर्माण करणे हे मोठे आव्हान आहे. यापुढे कुशल आणि सर्जनशील लोकांना नोकऱ्या मिळतील. सेवा क्षेत्रातही मोठी संधी आहे. पण तुम्ही किती चांगली सेवा देता, यावर तुम्हाला रोजगार मिळेल. पुढे काय घडेल, समजत नाही. बदल घडत राहणार आहे. त्यामुळे भविष्याचा अंदाज घेऊन बदलत्या परिस्थितीनुसार शिक्षण तयार करावे लागेल. आज ज्या नोकऱ्या आहेत, त्या प्रकारचे शिक्षण नाही. अभियांत्रिकी शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना कारखान्यात कशाप्रकारचे काम असते, ते शिकविलेच जात नाही. श्रमाला महत्त्व दिले जात नाही, श्रम करायला लागला की दुय्यम ठरविले जाते. हा व्यवस्थेतला दोष आहे. शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकाला नोकरी पाहिजे असेल, तर तेवढ्या नोकऱ्या कशा तयार होतील. त्यासाठी तरुणाई स्वयंरोजगाराकडे वळविली पाहिजे. त्याबरोबरच सरकारी धोरणे ही भविष्यातील बदलांना अनुकूल अशी करावी लागतील. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर होणार असेल, तर त्यासाठी योग्य धोरण आखावेच लागेल. हे खरे असले, तरी प्रत्येक तरुणाने ज्ञान मिळवून स्वत:च्या पायांवर उभे राहण्याचाही प्रयत्न केला पाहिजे.
(डॉ. भटकर  नालंदा विद्यापीठाचे कुलपती आहेत.)

रोजगार मेळाव्यासंबंधी सकाळमध्ये प्रसिद्ध झालेले वृत्त -

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com