भोर : शिकारीला गेलेल्या तरुणास बंदूकीची गोळी लागून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 22 November 2020

ससा दिसल्यावर त्यास गोळी मारुन अमित त्याचा पाठलाग करत मागे पळत असताना बांधावरुन पडला. त्या वेळी त्याच्या हातातील बंदूकीमधून गोळी उडून त्याच्या छातीत घुसली.

नसरापूर : शिकारीसाठी डोंगरात गेलेल्या तरुणाचा सशाचा पाठलाग करताना बांधावरून पडून स्वत:च्या हातात आसलेल्या बंदुकीची गोळी सुटून छातीत घुसल्याने मृत्यू झाला. अमित दिपक भडाळे (वय २५  रा. साळवडे, ता. भोर) या तरुणाचा या घटनेत मृत्यू झाला आहे. त्याचा भाऊ अतुल भडाळे यांनी राजगड पोलिस ठाण्यात या बाबत खबर दिली आहे.

जबाबदारी स्वीकारणारेच यशस्वी ठरतात; पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना मूलमंत्र

पोलिस निरीक्षक विनायक वेताळ यांनी माहिती देताना सांगितले की, (ता.२१ रोजी) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास अमित भडाळे हा त्याचे मित्र अक्षय अंकुश जाधव व बाबाराजे काळुराम जाधव दोघेही (रा. कांजळे, ता. भोर) यांच्यासह अमित आजोबांच्या नावाने असलेली बंदूक घेऊन कामथडी ते करंदी या रस्त्याने डोंगराच्या बाजूला शिकारीला गेले होते.

दरम्यान, त्यांना ससा दिसल्यावर त्यास गोळी मारुन अमित त्याचा पाठलाग करत मागे पळत असताना बांधावरुन पडला. त्या वेळी त्याच्या हातातील बंदूकीमधून गोळी उडून त्याच्या छातीत घुसली. मित्रांनी त्यास तातडीने नसरापूर येथील खाजगी रुग्णालयात आणले. तेथून पुणे येथे उपचारासाठी नेले, परंतू उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Corona Updates: दिवाळीनंतर कोरोनाचा प्रसार वाढला; 24 तासांत 45 हजारांपेक्षा जास्त रुग्ण

घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी धनंजय पाटील भेट देऊन माहिती घेतली. पुढील तपास निरीक्षक विनायक वेताळ यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक के वार सागवेकर करत आहेत.

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A youth was shot dead in Kamathadi area

Tags
टॉपिकस
Topic Tags: