
पुणे : "बाहेरील वातावरण काहीही असो...आमच्या शाळेची घंटा मात्र आज खुप दिवसानंतर वाजली बरं का!! भल्या मोठ्या सुटीनंतर आज आमची शाळा पुन्हा भरली. यंदाचा शाळेचा पहिला दिवस खुपच वेगळा आणि भन्नाट होता. आम्ही आमच्या आवडत्या शिक्षकांना आणि हो, मित्रांनाही भेटलो आणि तेही घरातल्या घरात राहूनच !!, असा अनुभव व्हर्च्युअल शाळेत आज हजेरी लावलेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाचा शाळेचा पहिला दिवस मोठ्या जल्लोषात साजरा झाला नसला तरीही, विद्यार्थ्यांनी कॉम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईलच्या सहाय्याने व्हर्च्युअल शाळेचा पहिला दिवस "एन्जॉय' केला. शाळेच्या नियमित वेळेनुसार घंटा वाजली ती गॅझेटच्या सहाय्याने विद्यार्थ्यांनी लगेच आपल्या ऑनलाईन शाळेत हजेरी लावली आणि गप्पा-गोष्टींनी ही शाळा सुरू झाली. नवीन मराठी शाळेने पालकांच्या मोबाईलवर "व्हर्च्युअल शाळेचा पहिला दिवसाचे स्वागत' असे व्हिडिओ करून पाठविले आणि ते विद्यार्थ्यांना दाखविले. त्याचा प्रतिसादही पालकांकडून मागून घेतला. तर काही शाळांनी संबंधित शिक्षण संस्थेच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे यशस्वी लॉगिन करून घेतले आणि त्याद्वारे ऑनलाईन शाळा सुरू केली.
पुण्यात सलग आठव्या दिवशी पेट्रोल दरवाढीचा भडका
येरवड्यातील गेनबा सोपानराव मोझे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक प्रशालेने पालकांना शाळेत बोलावून मोफत पाठ्यपुस्तकाचे वाटप केले. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांनी शाळेचा गणवेश घालून ऑनलाईन वर्गाला हजेरी लावली. नेहमीप्रमाणे राष्ट्रगीत, प्रार्थना अशा पद्धतीने "ऍप'च्या सहाय्याने शाळा भरली, असे शाळेचे मुख्याध्यापक संजय सोमवंशी यांनी सांगितले.
लॉटरी बहाद्दारांची लॉकडाऊनमध्ये 'अशी' लागली 'लॉटरी'
""नेहमीप्रमाणे प्रत्यक्ष शाळा भरणार नसली, तरीही आजपासून ऑनलाईन शाळा सुरू होणार असल्याचे शाळेकडून यापुर्वीच सांगण्यात आले होते. त्याप्रमाणे घराच्या एका कोपऱ्यात मुलांसाठी ऑनलाईन वर्गासाठी आवश्यक व्यवस्था केली. शाळेच्या पहिला दिवसाची मज्जा मुलांना याही वर्षी घेता यावी, म्हणून शाळेचा टापटिप गणवेश, नवे शुज, दप्तर अशी तयारी केली. एवढंच नव्हे तर शाळेच्या वेळेनुसार त्यांना शाळेपर्यंत गाडीतून फिरवून आणले आणि शाळेची घंटा वाजण्यापूर्वी पुन्हा घरातील ऑनलाईन वर्गात आणून सोडले. त्यामुळे मुलांचा शाळेच्या पहिल्या दिवसाचा उत्साह द्विगुणित झाला.''
- नितीन पंडित, पालक
डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितली आरोग्यासाठी पंचसूत्री; वाचा सविस्तर
"पहिलीत असताना शाळेत गेले होते ना, तसेच आज वाटले. बाबांच्या मोबाईलवर शाळेने पाठविलेला व्हिडिओ पाहिला. शाळेतील सगळ्यांची खुप आठवण आली. आजही मी शाळेच्या पहिल्या दिवसाचा अनुभव घेतला."
- श्रीरिता जोशी, विद्यार्थिनी (नवीन मराठी शाळा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.