Punjab: भगतसिंगांच्या गावी घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ; आपची घोषणा

भगतसिंग यांची जन्मभूमी असलेल्या खटकरकला या गावात मान हे शपथ घेतील.
Bhagvant Man
Bhagvant ManSakal

चंदीगढ : पंजाबसहीत पाच राज्यांतील विधानसभांचे निकाल लागले असून पाचपैकी चार राज्यांत भाजपाने आघाडी घेतली असून पंजाबमध्ये आपने आघाडी घेतली आहे. ११७ जागांपैकी ९२ जागांवर आपने आघाडी मिळवली असून कॉंग्रेसचा दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे आता दिल्लीच्या बाहेर आम आदमी पक्षाचं पहिल्यांदा सरकार स्थापन होणार असल्याचं स्पष्ट झालंय. आप कडून भगवंत मान यांची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी सर्व जनतेचे आभार मानले आहे. त्याचबरोबर जे लोकं सोबत येऊ शकले नाहीत त्यांचेही आभार त्यांनी मानले आहेत.

त्यानंतर त्यांनी आम्ही जनतेचे सेवक असून जनतेची सेवा करण्यासाठी निवडून आलो आहोत असं म्हटलं आहे. याआधी पंजाबचा कारभार मोठमोठ्या शहरातून चालायचा आता शेतातून आणि खेड्यातून कारभार चालेल असे आश्वासन त्यांनी जनतेला यावेळी दिले. सर्वात आधी राज्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले.

तसेच अरविंद केजरीवाल हे बोलताना म्हणाले की, आता देशाच्या प्रगतीला रोखू शकणार नाही. आमच्या राज्यात आम्ही चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथून पुढे मुलांना शिक्षणासाठी युक्रेनसारख्या देशात जावं लागणार नाही असंही त्यांनी बोलताना म्हटलं आहे.

तसेच त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ शहीद भगतसिंग यांच्या गावात घेणार असल्याची माहीती समोर आली आहे. भगतसिंग यांची जन्मभूमी असलेल्या खटकरकला या गावात मान हे शपथ घेतील. दरम्यान आपचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मान यांचे कौतुक करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

भगवंत मान यांनी आता यापुढे प्रत्येक सरकारी कार्यालयातील मुख्यमंत्र्याचा फोटो हटवला जाणार असल्याचं सांगितलं. तसेच स्वातंत्र्यासाठी बलिदान देणारे भगतसिंग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो लावण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री झाल्यावर ते हा निर्णय घेणार का हे पहावे लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com