
पंजाब निवडणुकांमध्ये विजय मिळविल्याबद्दल आपचे अभिनंदन - नरेंद्र मोदी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाब विधानसभेत आम आदमी पक्षाने (Aap) मिळविलेल्या विजयाबद्दल ट्विट करुन पक्षाचे अभिनंदन केले आहे. मोदी आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, की मी आपचे पंजाब निवडणुकांमध्ये (Punjab Assembly Elections 2022) विजय मिळविल्याबद्दल अभिनंदन करतो. मी त्यांना आश्वस्त करतो की शक्य ती मदत केंद्राकडून पंजाबच्या कल्याणासाठी दिली जाईल. आज गुरुवारी (ता.दहा) पाच विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आहे. यात चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने विजय मिळविला आहे. M Narendra Modi Congratulate Aap For Victory In Punjab Assembly Elections)
हेही वाचा: Akhilesh Yadav | अखिलेश यादवांचा दमदार विजय,भाजपच्या केंद्रीय मंत्र्याला हरवले
या निमित्त पक्षाच्या मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. या प्रसंगी ते म्हणाले, युपीच्या लोकांना कळले आहे की जातीच्या नावाने बदनाम करणाऱ्यांपासून, समाजाचे बदनाम करणाऱ्यांपासून आता दूर राहिले पाहिजे. पंजाबमध्ये आपने काँग्रेसचा दणदणीत पराभव केला आहे.
Web Title: Pm Narendra Modi Congratulate Aap For Victory In Punjab Assembly Elections
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..