भारताच्या न्यायाधीशानं रशियाच्या विरोधात केलं मतदान

Indian Justice Dalveer Bhandari
Indian Justice Dalveer Bhandariesakal
Summary

मतदानादरम्यान रशियानं युक्रेनमधील लष्करी कारवाया तत्काळ थांबवाव्यात या बाजूनं 13 देश होते.

रशिया आणि युक्रेन युद्धाला (Russia and Ukraine war) दोन आठवडे उलटून गेले तरी रशिया आणि युक्रेनमधील युद्ध सुरूच आहे. अशातच ICJ नं रशियाला युक्रेनमधील लष्करी कारवाया त्वरित थांबवण्याचे आदेश दिले आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयात (International Court of Justice) दिलेल्या आदेशात म्हटलंय की, रशियानं 24 फेब्रुवारी 2022 रोजी युक्रेनच्या जमिनीवर सुरू केलेल्या लष्करी कारवाया तत्काळ स्थगित कराव्या. याबरोबरच रशियन फेडरेशन (Russian Federation) पुढील लष्करी कारवाईसाठी कोणतीही पावले उचलणार नाही याची खात्री करेल. दोन्ही देशांनी वाद चिघळणाऱ्या कृती पासून दूर रहावं, असं देखील न्यायालयानं म्हटलंय. आंतरराष्ट्रीय न्यायालयात युक्रेननं रशियाविरोधातला खटला जिंकलाय. 13-2 च्या निर्णयानंतर CJI नं हा आदेश जारी केलाय.

Indian Justice Dalveer Bhandari
युक्रेनमधील लष्करी कारवाई तात्काळ थांबवावी; ICJ चे रशियाला आदेश

मतदानादरम्यान रशियानं युक्रेनमधील लष्करी कारवाया तत्काळ थांबवाव्यात या बाजूनं 13 देश होते, तर 2 देशांनी विरोधात मतदान केलंय. संयुक्त राष्ट्र न्यायालयातील भारतीय न्यायमूर्ती दलवीर भंडारी (Indian Justice Dalveer Bhandari) यांनी रशियाच्या विरोधात बहुमताच्या बाजूनं मतदान केलंय. संयुक्त राष्ट्रांच्या न्यायालयात 15 न्यायाधीश असतात. यामध्ये ICJ अध्यक्ष जाॅन ई डोनोग्यू President Joan E. Donoghue (यूएसए), न्यायाधीश पीटर टोमका (स्लोव्हाकिया), न्यायाधीश रॉनी अब्राहम (फ्रान्स), न्यायाधीश मोहम्मद बेन्नौना (मोरक्को), न्यायाधीश अब्दुलकावी अहमद युसूफ (सोमालिया), न्यायाधीश ज्युलिया सेबुटिंडे (युगांडा), न्यायमूर्ती दलवीर भंडारी (भारत), न्यायाधीश पॅट्रिक लिप्टन रॉबिन्सन (जमैका), न्यायाधीश नवाफ सलाम (लेबनॉन), न्यायाधीश इवासावा युजी (जपान), न्यायाधीश जॉर्ज नोल्टे (जर्मनी), न्यायाधीश हिलरी चार्ल्सवर्थ (ऑस्ट्रेलिया) आणि न्यायाधीश तदर्थ दौडेट यांनी बहुमताच्या बाजूनं मतदान केलंय.

Indian Justice Dalveer Bhandari
'कश्मीर फाईल्स बनत असेल, तर लखीमपूर फाइल्स का नाही?'

'या' दोन देशांनी रशियाच्या बाजूनं केलं मतदान

दोन न्यायाधीशांनी रशियाच्या बाजूनं मतदान केलंय. यात उपराष्ट्रपती किरील गेव्हॉर्जियन (रशिया) आणि न्यायाधीश स्यू हनकिन (चीन) आहेत. आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे निर्णय बंधनकारक असताना ICJ कडं त्यांच्या आदेशांची अंमलबजावणी करण्याचं कोणतंही थेट साधन नसल्यामुळं देशांनी त्यांच्याकडं दुर्लक्ष केल्याची प्रकरणं समोर आली आहेत.

Indian Justice Dalveer Bhandari
'असनी' चक्रीवादळाचा बंगालच्या उपसागराला बसणार फटका?

कोण आहेत दलवीर भंडारी?

जागतिक न्यायालयातील न्यायमूर्ती दलवीर भंडारी यांची ही दुसरी टर्म आहे. 2012 मध्ये ते पहिल्या टर्मसाठी निवडून आले आहेत. 2018 नंतर भारतानं त्यांना पुन्हा नामांकन दिलंय. यूके नामांकित न्यायमूर्ती ग्रीनवुड यांचा पराभव करून भंडारी यांनी ICJ मध्ये आणखी एक टर्म मिळवलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com