Punjab Assembly Election: पंजाबसाठी चेहरा लवकरच ठरवू - राहुल गांधी

पंजाबसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मतदानाआधी ठरविण्याचा निर्णय काँग्रेसला अखेर घ्यावा लागला.
राहुल गांधी
राहुल गांधीesakal

जालंधर : पंजाबसाठी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मतदानाआधी ठरविण्याचा निर्णय काँग्रेसला अखेर घ्यावा लागला. कार्यकर्त्यांशी चर्चा करून लवकरच हे नाव जाहीर केले जाईल, असे राहुल गांधी यांनी येथील व्हर्च्युअल सभेत सांगितले.

राहुल यांनी पंजाबमधील प्रचाराचा सुवर्णमंदिरात प्रार्थनेने केला. त्यावेळी मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हे दोघे त्यांच्याबरोबर होते. या दोघांपैकी एकाला पसंती मिळेल असे स्पष्ट संकेत राहुल यांनी दिले.

राहुल गांधी
पोलीसांची सतर्कता आणि माय लेकरांची भेट; वाचा सविस्तर प्रसंग

चन्नी-सिद्धू यांच्यात एकी असल्याचे राहुल यांनी नमूद केले. ज्याची निवड होईल त्याला पाठिंबा देऊ अशी ग्वाही चन्नी आणि सिद्धू यांनी दिल्याचे सांगून ते म्हणाले की, मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार असा उल्लेख प्रसार माध्यमे करतात, पण सिद्धू व चन्नी म्हणाले की, दोन व्यक्ती नेतृत्व करू शकत नाहीत आणि केवळ एक जण नेतृत्व करू शकतो. जो कुणी नेतृत्व करेल त्याच्या पाठीशी आपली ताकद ताकद एकवटू.

साधारणपणे आम्ही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार आधी ठरवत नाही, पण पंजाबला हे हवे असेल तर आम्ही निर्णय घेऊ. ही मागणी लवकरात लवकर पूर्ण केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

राहुल गांधी
१००% राजकारणासाठी ठाकरेंचं राजकीय सीमोल्लंघन

निवडणूक आयोगाने प्रत्यक्ष प्रचारसभांना असलेल्या बंदीचा कालावधी ३१ तारखेपर्यंत वाढविला आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल पंजाबमध्ये प्रथमच आले आहेत.

प्रत्येक वेळी दरबार साहिब येथे मस्तक टेकविल्यानंतर वाटते तसेच छान वाटले. आपलेपणाची भावना दाटून आली. एक ओंकार!

- राहुल गांधी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com