Punjab Election 2022: विरोधकांचे टार्गेट मुख्यमंत्री चन्नी

निवडणूक रिंगणात उतरलेले पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी हे विरोधकांचे लक्ष ठरले आहेत.
चन्नी
चन्नी sakal

चंदीगड : काँग्रेस अंतर्गत मतभेदामुळे बेजार झालेले आणि दोन मतदारसंघातून निवडणूक रिंगणात उतरलेले पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी हे विरोधकांचे लक्ष ठरले आहेत. भाजपा, शिरोमणी अकाली दल, ‘आप’ने चन्नी यांनाच टार्गेट करण्यामागे त्यांच्या नातेवाइकांवर पडलेली ईडीचे छापे, प्रतिज्ञापत्रात सादर केलेल्या संपत्तीवरून स्वकियांनीच केलेले आरोप आदी कारणे आहेत. (Punjab Assembly Election Updates)

चन्नी हे त्यांच्या पारंपारिक चमकोरसाहिब व भदौड अशा दोन मतदारसंघातून रिंगणात आहेत. चमकोरसाहिब मतदारसंघातून ते सलग १५ वर्षे आमदार आहेत. यावेळी ते दलित मतांवर डोळा ठेवत भदौडमधूनही रिंगणात उतरले आहेत. चमकोरसाहिब मतदारसंघात ‘आप’च्या डा. चरणजित सिंह यांचे आव्हान आहे. डॉ. सिंह हेही दलित समाजाचे असल्याने चन्नी यांच्या हक्काच्या मतात विभागणी होण्याची शक्यता आहे. २०१४ पासून या मतदारसंघांवर ‘आप’चे वर्चस्व आहे. ‘आप’चे लाभ सिंह हे चन्नी यांचे या मतदारसंघातील विरोधक आहेत.

चन्नी
कोथरूड : भीमनगरमधील रहिवाशांचा मतदानावर बहिष्कार

२०१४ व २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ‘आप’ने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर २०१७ च्या विधानसभा निवडणुकीतही ‘आप’चा उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाला आहे. हा मतदारसंघ मालवा विभागात येतो, तिथे असलेले ‘आप’चे वर्चस्व कमी करण्यासाठीच काँग्रेसने या मतदारसंघातून चन्नी यांना रिंगणात उतरले. याच मतदारसंघात ‘आप’चे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार भगवंत मान यांची मोठी क्रेझ आहे, ती कमी करणे हाही चन्नी यांना या मतदारसंघातून उतरवण्यामागचे कारण आहे.

भदौडमध्ये १ लाख ५७ हजार मतदारांपैकी ६० हजार मतदार दलित आहेत, ४० हजार जाट शिख तर इतर मतदार हिंदू किंवा ओबीसी आहेत.चमकोरसाहिब मतदारसंघात ६५ टक्के मते दलितांची आहेत. २० टक्के जाट, शिख तर उर्वरित मते हिंदू व ओबीसींची आहेत. या मतदार संघातून ११ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com