
पंजाब : काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा चन्नीच? दोन जागांवर मिळाली उमेदवारी
काँग्रेसने रविवारी पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी (Punjab Assembly Elections) उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. जाहीर झालेल्या यादीत एकूण आठ उमेदवारांची नावे आहेत. यादीनुसार पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी (Charanjit Singh Channi) दोन जागांवर निवडणूक लढवणार आहेत. चन्नी हे चमकौर साहिब (एससी) व भदौर येथून निवडणूक लढवणार असल्याने काँग्रेसकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा चन्नीच, असणार असे बोलले जात आहे. मात्र, पक्षाकडून अद्याप याची घोषणा करण्यात आलेली नाही.
काँग्रेसने (Congress) जाहीर केलेल्या आठ उमेदवारांच्या यादीत तरसेम सिंग सियालका यांना अटारीचे उमेदवार बनवण्यात आले आहे. दुसरीकडे खेम करणमधून सुखपालसिंग भुल्लर, नवनशहरमधून सतबीर सिंग सैनी, लुधियाना दक्षिणमधून ईश्वरजोत सिंग चीमा, जलालाबादमधून मोहन सिंग, भदौरमधून चरणजित सिंग चन्नी (Charanjit Singh Channi), बरनाळामधून मनीष बन्सल आणि पाटीलयातून विष्णू शर्मा यांना उमेदवारी दिली आहे. भदौर हे बर्नाल जिल्ह्याचे ठिकाण आहे. या जागेवर चन्नी यांना आम आदमी पक्षाकडून कडवी लढत मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: बापूंच्या पुण्यतिथीला कालीचरणला ‘गोडसे आपटे भारतरत्न’ पुरस्कार
‘द हिंदू’ला दिलेल्या मुलाखतीत चरणजीत सिंह चन्नी यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. काँग्रेसने पंजाब निवडणुकीसाठी अद्याप मुख्यमंत्रिपदाची घोषणा का केली नाही, असे विचारले असता? चरणजित सिंग चन्नी यांनी स्पष्ट केले की, काँग्रेस पक्षात कोणतीही भांडणे नाही. पंजाबमधील जनता विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदाची मागणी करीत आहे, असे ते म्हणाले.
एक दिवसापूर्वी काँग्रेसने (Congress) पंजाब विधानसभा निवडणुकीसाठी (Punjab Assembly Elections) चार प्रादेशिक निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. पक्षाने जारी केलेल्या निवेदनानुसार माळवा प्रदेशासाठी संजय निरुपम आणि अर्जुन मोधवाडिया या दोन निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. उत्तम कुमार रेड्डी यांची माझा क्षेत्राचे पर्यवेक्षक म्हणून आणि सुखविंदर सिंग सुखू यांची दोआबा क्षेत्राचे पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २० फेब्रुवारीला राज्यातील सर्व ११७ जागांसाठी मतदान होणार आहे. १० मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहे.
Web Title: Punjab Assembly Elections Charanjit Singh Channi Congress Third List Announced
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..