
सत्तेत येताच भगवंत मान यांचा मोदींना दणका, केंद्राविरोधात आणला ठराव
यावर्षी देशात पाच राज्यांत झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप सर्वा मोठा पक्ष म्हणून समोर आला. मात्र, पंजाबात आम आदमी पक्षाने बाजी मारली. यंदा ९० हून जास्त जागा मिळवत विरोधकांना नामोहरम करण्यात आपने यश मिळवलं. (Punjab Aam Adami Party)
यानंतर आता केंद्र विरुद्ध राज्य हा संघर्ष पेटला जाण्याची शक्यता आहे. चंदिगड शहराला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा असताना आता हे शहर पंजाब राज्यात विलीन करावं असा प्रस्ताव देण्यात आला आहे. यावर भगवंत मान यांनी सर्वमतही घेतलं. त्यामुळे केंद्र सरकारच्या निर्णयाला थेट आव्हान असल्याचं बोललं जातंय.
हेही वाचा: पंजाब : VVIP ची सुरक्षा घटवली; शपथविधीपूर्वीच भगवंत मान अॅक्शनमोडमध्ये!
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी चंदिगडला केंद्रीय नियमांतर्गत ठेवण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरोधात ठराव मांडला आहे. पंजाबात सत्ता येताच आम आदमी पक्षाच्या सरकारने तत्काळ अधिवेशन भरवलं. यामध्ये मुख्यमंत्री मान यांनी केंद्र सरकारला चंदिगड पंजाबला हस्तांतरित करण्याचा प्रस्ताव देण्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे.
केंद्रशासित प्रदेशातील कर्मचाऱ्यांना सेंट्रल सर्व्हिस कमिशनच्या नियमांअंतर्गत विस्तार करण्यासाठी केंद्राने अधिसूचना जारी केली होती. केंद्राच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी पंजाब विधानसभेचे एक दिवसीय विशेष अधिवेशन सुरू केलं आहे.
Web Title: Punjab Cm Bhagwant Mann Moves Resolution Against Chandigarh Under Central Service Rules
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..