Budget 2021: संजय राऊतांनी सुनावले, देशाचे बजेट की पक्षाचे बजेट होते

Budget 2021: संजय राऊतांनी सुनावले, देशाचे बजेट की पक्षाचे बजेट होते

मुंबई: आज मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या पर्वातील तिसरा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अनेक नव्या घोषणा केल्या. आजच्या केंद्रीय अर्थसंकल्पावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बजेटमध्ये महाराष्ट्र शोधण्याचा प्रयत्न करतोय, अशी तिखट प्रतिक्रिया संजय राऊतांनी दिली आहे.  बजेटचा डोलारा महराष्ट्रावर अवलंबून पण आम्हाला निराशा करणारा असल्याचंही राऊत म्हणालेत. 

खिशात नाही आणा आणि बाजीराव म्हणा. तसे हे दिल्लीतील बाजीराव आहेत, असंही ते म्हणालेत. महाराष्ट्र आणि मुंबईतून देशाला सगळ्यात जास्त महसूल मिळतो. मात्र महाराष्ट्राच्या वाट्याला या अर्थसंकल्पात काहीही मिळालेलं नाही. महाराष्ट्रानं देशाला देण्याची दानत दाखवली आहे. मात्र महाराष्ट्रावर मात्र नेहमी अन्याय होत आलेला आहे असं म्हणत आकडे अर्थमंत्री देत आहेत. त्यातले किती आकडे खरे आहेत? किती खोटे आहेत? हे सहा महिन्यात कळेल, असं म्हणत संजय राऊतांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. 

आर्थिक थापा बंद करायला हव्यात, असंही ते म्हणालेत. नाशिक आणि नागपुरात भाजपची सत्ता असल्यानं मेट्रोसाठी निधी दिला, हे पटणारं नाही. यापुढं त्या शहरात त्यांची सत्ता राहणार नाही, असंही राऊत यांनी म्हटलं आहे. 

मुंबईची मेट्रो का अडकून ठेवलीय ? जमीन केंद्राची आहे म्हणतात. कुठून मंगळावरून जमीन आणलीय का? असा सवालही राऊतांनी केंद्र सरकारला विचारला आहे. 

शेतकऱ्यांचे ऐका जरा. भांडवलदारांसाठी हे कायदे बनवलेत. काही राज्यांच्या निवडणुका लक्षात घेऊन निधी वाटप केले आहे का? देशाचे बजेट की पक्षाचे बजेट होते, अशी खोचक टीकाही संजय राऊतांनी आजच्या अर्थसंकल्पावर केली आहे.

Union Budget 2021 reaction of shivsena mp sanjay raut

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com