

Bank Strike Called Off
Esakal
बँकांचा तीन दिवसांचा होणारा संप मागे घेण्यात आलाय. रविवारी रात्री इंडियन बँक्स असोसिएशन आणि युनायटेड फोर ऑफ बँक युनियन यांच्यात झालेल्या बैठकीनंतर संप तात्पुरता स्थगित करण्यात आलाय. बँक कर्मचाऱ्यांची पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करण्याची प्रमुख मागणी होती. बैठकीत काही महत्त्वाच्या मागण्यांवर चर्चा करण्याचे ठरल्यानंतर UFBUने प्रस्तावित आंदोलन आणि संप पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे २८ ते ३० सप्टेंबरदरम्यान बँक सेवा बंद राहण्याची शक्यता आता टळली आहे.