Premium|Crude Oil Prices : युद्धाच्या झळा कच्च्या तेलाला!

Global Energy Crisis : इराण-इस्राईल संघर्षाने जागतिक तेल बाजारपेठ हादरली असून आयातुल्ला खामेनी यांच्या निधनानंतर कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत; होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर महागाईचे संकट ओढवण्याची दाट शक्यता निर्माण झाली असून इंधन सुरक्षा धोक्यात आली आहे.
Crude Oil Prices

Crude Oil Prices

esakal

Updated on

कौस्तुभ केळकर - kmkelkar@rediffmail.com

अमेरिका; तसेच इस्राईलने अलीकडेच केलेल्या जोरदार हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. यामुळे इराण प्रचंड संतापला असून, इराणने अमेरिकेचे आखाती देशातील तळ, युद्धनौका; तसेच इस्राईलवर हल्ले करून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. हा संघर्ष लवकर संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. जागतिक अर्थव्यवस्था अजूनही मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलावर अवलंबून आहे. त्यामुळे पश्चिम आशियातील प्रत्येक हालचाल तेलाच्या किमतीत प्रतिबिंबित होते. साहजिकच गेले काही महिने ६० ते ७० डॉलर प्रति बॅरल या पट्ट्यामध्ये असलेल्या ब्रेंट क्रूडचा दर (कच्चे तेल) ८३ डॉलर प्रतिबॅरलवर पोचला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com