India’s First Budget: How Much Money Did the Nation Really Have in 1947?
eSakal
Sakal Money
Budget 2026 : भारताच्या पहिल्या बजेटवेळी देशाची अवस्था काय होती? तिजोरीत फक्त ‘इतकेच’ पैसे! सर्वाधिक खर्च कशावर केला होता?
Budget 1947 : देशात आता सर्वांच्या नजरा केंद्रीय अर्थसंकल्पाकडे लागल्या आहेत. अशा परिस्थितीत इतिहासाकडे नजर टाकली, तर स्वातंत्र्यानंतर भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी सादर करण्यात आला होता आणि आजच्या तुलनेत त्यावेळी फक्त 197 कोटींची तरतूद करण्यात आली होती.
India's First Budget After Independace : देशात 1 फेब्रुवारी 2026 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला जाणार आहे. नेहमीप्रमाणे या वेळीही सामान्य नागरिकांपासून उद्योगजगतापर्यंत सर्वांची नजर याकडे लागून आहे. करात सूट मिळेल की महागाईची मार भोगावी लागेल, हा प्रश्न सर्वांच्या मनात आहे. पण या मोठ्या बजेटच्या गडबडीत तुम्ही कधी विचार केला आहे का की भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा देशाच्या तिजोरीची अवस्था काय होती? आज आपण ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची चर्चा करतो, तर विश्वास बसायला कठीण होतं की स्वातंत्र्याच्या पहिल्या बजेटचा आकार इतका लहान होता. तर मग याच पहिल्या बजेटविषयी जाणून घेऊयात.

