E85 Fuel: केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांना मोठा दिलासा! पेट्रोलपेक्षा स्वस्त E85 इंधन लॉन्च; आता किती आणि कशी बचत होणार?

Flex fuel vehicles: E85 इंधनामध्ये ८०-८५ टक्के इथेनॉल आणि १४-१९ टक्के गॅसोलीन असते. याचा वापर केवळ फ्लेक्स-फ्यूएल वाहनांमध्येच केला जाऊ शकतो. E20 ते E100 पर्यंतच्या विविध इंधन मिश्रणांवर चालण्यास सक्षम असतात.
Flex fuel vehicles

Flex fuel vehicles

ESakal

Updated on

केंद्र सरकारने फ्लेक्स-फ्यूएल वाहनांसाठी ई८५ हे उच्च-इथेनॉल मिश्रित इंधन नियमित पेट्रोलपेक्षा प्रति लिटर २० रुपयांच्या सवलतीत सादर केले आहे. हे इंधन सुरुवातीला निवडक पेट्रोल पंपांवर उपलब्ध असेल आणि त्याचा वापर केवळ फ्लेक्स-फ्यूएल इंजिन असलेल्या वाहनांमध्येच करता येईल. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त येथील इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपावर ई८५ इंधनाचे अनावरण केले. हे इंधन देशभरातील ४८ सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोल पंपांवर विकले जाईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com