
Central government On Farmer
ESakal
दिवाळीपूर्वी मोदी सरकारने शेतकऱ्यांना एक मोठी भेट दिली आहे. बुधवारी (१ ऑक्टोबर २०२५) केंद्र सरकारने रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) वाढवण्याचा निर्णय घेतला. सरकारने यासाठी ८४,२६३ कोटी रुपयांची घोषणा केली आहे. हे पॅकेज सहा वर्षांसाठी असेल. याव्यतिरिक्त केंद्र सरकारने डाळींना प्रोत्साहन देण्यासाठी ११,४४० कोटी रुपयांचे पॅकेज मंजूर केले आहे.