

Dharmendra Pradhan Net Worth: How Rich Is India's Education Minister? Assets Revealed in Election Affidavit
eSakal
Dharmendra Pradhan Net Worth: देशात NEET (नीट) परीक्षा पेपर फुटीच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत राजकीय वातावरण तापले आहे. दिल्लीच्या जंतर-मंतरवर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू असून, विरोधी पक्षांकडून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांची संपत्ती हा चर्चेचा विषय ठरत आहे.