
Mutual Fund Investment: गुंतवणूकदारांच्या मनात एक प्रश्न नेहमी घोंगावत असतो. तो म्हणजे, दर महिन्याला थोडी थोडी रक्कम गुंतवावी का एकदम मोठा पैसा एकदाच गुंतवावा? म्हणजेच SIP चा मार्ग निवडावा की लमसम गुंतवणुकीचा?
एकीकडे SIP – म्हणजे शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणूक, जी वेळेनुसार वाढत जाते. दुसरीकडे लमसम गुंतवणूक – म्हणजे बाजारात योग्य वेळ साधून एकदाच मोठा पैसा गुंतवणं, ज्यामधून मोठा परतावा मिळू शकतो, पण जोखमीसुद्धा तितकीच मोठी असते.