

New TDS rules 2026
esakal
बी. एम. रोकडे - bmrokade@hotmail.com
नवा प्राप्तिकर कायदा २०२५ची अंमलबजावणी एक एप्रिल २०२६ पासून सुरू झाली आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच प्राप्तिकर विभागाने सर्वसामान्य करदात्यांसाठी महत्त्वाच्या बदलांचीही घोषणा केली आहे. करप्रणाली अधिक आधुनिक आणि सोपी करण्यासाठी जुने विविध फॉर्म रद्द केले असून, अधिक सोपे, सुटसुटीत फॉर्म दाखल केले आहेत. उदगम करकपात (टीडीएस) टाळण्यासाठी फॉर्म १५जी आणि १५एच हे फॉर्म पूर्वी भरावे लागत होते. हे फॉर्म आर्थिक वर्ष २०२६-२७ पासून बंद होऊन त्या जागी आता नवा फॉर्म १२१ सुरू झाला आहे.
पल्या मुदत ठेवींवरील व्याज किंवा शेअरवरील लाभांश यांसारख्या उत्पन्नावरील उद्गम करकपात (टीडीएस) टाळण्यासाठी फॉर्म १५जी आणि १५एच हे फॉर्म आर्थिक वर्ष २०२५-२६ पर्यंत भरावे लागत होते. हे फॉर्म आर्थिक वर्ष २०२६-२७ पासून बंद होऊन त्या जागी आता नवा फॉर्म १२१ (प्राप्तिकर कायदा, २०२५ नियम क्र. २११ अंतर्गत) सुरू झाला आहे.