

Budget making timeline
ESakal
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करतील. मंगळवारी हलवा समारंभानंतर अर्थसंकल्पात सहभागी असलेल्या अधिकाऱ्यांना अर्थ मंत्रालयाच्या आवारात कडक सुरक्षेत आणि बाहेरील जगापासून दूर ठेवण्यात आले आहे. अर्थसंकल्पाच्या तयारीभोवती असलेल्या उच्च तंत्रज्ञानाच्या सुरक्षेत अर्थसंकल्पाची महत्त्वाची माहिती असलेली ब्लू शीट देखील चर्चेत आहे.