Petrol Diesel Price Hike India
esakal
देशात पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. कारण, देशात वापरल्या जाणाऱ्या कच्च्या तेलाची किंमत १०० डॉलरच्या पुढे गेली आहे. पेट्रोलियम प्लॅनिंग अँड अॅनालिसिस सेलच्या आकडेवारीनुसार, ८ सप्टेंबर रोजी इंडियन बास्केट क्रूडची किंमत १००.७५ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव वाढल्याने त्याचा परिणाम आता इंडियन बास्केटच्या किमतीवरही होत आहे.