अर्थवेध : चीनचा ‘जीडीपी’ धमाका : भारतासाठी संधी

चीनच्या ५% जीडीपी वाढीमुळे जागतिक मंदीची भीती कमी, भारतातील निर्यात, उत्पादन, धातू, आयटी व बँकिंग क्षेत्रांसाठी नवी गुंतवणुकीची संधी
चीनचा 'जीडीपी' धमाका! ५% विकासदरामुळे जागतिक मंदीचे ढग सरले; भारतासाठी २०-२५ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची मोठी संधी

चीनचा 'जीडीपी' धमाका! ५% विकासदरामुळे जागतिक मंदीचे ढग सरले; भारतासाठी २०-२५ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणुकीची मोठी संधी

sakal

Updated on

गौरव बोरा, भांडवली बाजाराचे अभ्यासक-विश्लेषक

जागतिक अर्थव्यवस्थेचे इंजिन मानल्या जाणाऱ्या चीनने २०२६ च्या पहिल्या तिमाहीत पाच टक्के ‘जीडीपी’ दर नोंदवून सर्वांनाच चकित केले आहे. यामुळे जागतिक बाजारपेठेतील ‘मंदीची भीती’ आता ‘वाढीच्या आशे’मध्ये बदलली आहे. चीन ही जगातील दुसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आहे. त्यामुळे तेथील मजबूत वाढ म्हणजे जागतिक व्यापार आणि वित्तीय बाजारांसाठी सकारात्मक संकेत आहे. चीनच्या वाढीमुळे जागतिक मागणी वाढण्याची अपेक्षा निर्माण झाली असून, जागतिक शेअर बाजारात जोखीम घेण्याची तयारी वाढली आहे. भारतीय बाजारासाठीही ही बातमी अत्यंत सकारात्मक आहे. चीनची वाढ मजबूत राहिल्यास भारतातील निर्यात, उत्पादन, धातू, आयटी, वाहन, कॅपिटल गुड्स, केमिकल्स, लॉजिस्टिक्स, बँकिंग आदी क्षेत्रांना फायदा होऊ शकतो.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com