
मेटा कंपनीत जगभरातील हाय प्रोफाइल इंजिनिअर्स काम करतात. यातही मेटा सुपरइंटेलिजन्स लॅबमध्ये अनेक दिग्गजांना मार्क झुकरबर्गनं घेतलंय. या लॅबमध्ये भविष्यातलं एआय तयार करण्याचं काम सुरूय. गेल्या काही महिन्यांपासून या लॅबमध्ये ज्या दिग्गज इंजिनिअर्सना घेतलं जातंय त्यांच्या पॅकेजची चर्चा मोठ्या प्रमाणावर होतेय. कारण या लॅबमध्ये ओपन एआय, गुगल, अॅपल कंपन्यांमधील इंजिनिअर्सना आपल्याकडे घेण्यात मार्क झुकरबर्गनं यश मिळवलं.