
बाबा रामदेव यांच्या पतंजलि फूड्सचे शेअर्स आज शेअर बाजारात पुन्हा चर्चेत आहेत. कंपनीच्या शेअरमध्ये आज २ टक्क्यांनी वाढ झाली असून १७५९ रुपयांवर इंट्रा डे हायला पोहोचले होते. शेअर्समध्ये इतकी वाढ होण्यामागे मोठं कारण आहे. भारतीय जीवन बीमा निगमने ओपन मार्केटच्या माध्यमातून पतंजलि फूड्समध्ये नवीन भागिदारी खरेदी केलीय. एलआयसीने कंपनीत जवळपास २ टक्के भागिदारी वाढवलीय. आता पतंजलि फूड्समध्ये एलआयसीची भागिदारी ७ टक्क्यांच्या वर पोहोचलीय.