

LIC Shares Gain as Centre Prepares to Reduce Stake Under SEBI Guidelines
Esakal
केंद्र सरकारकडून एलआयसीमधून भागिदारी आणखी कमी केली जाऊ शकते. सरकारकडून ८८०० ते १३२०० कोटी रुपयांचे शेअर्सची विक्री केली जाण्याची शक्यता आहे. ही विक्री वर्षाअखेरीस होऊ शकते. इकॉनॉमिक्स टाइम्सच्या रिपोर्टनुसार सरकारकडून कंपनीत जनतेची भागिदारी वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला जात आहे. एलआयसीचे शेअर्स केंद्र सरकार विकणार हे वृत्त समोर येताच आज एलआयसीच्या शेअर्समध्ये तेजी दिसून येत आहे. बुधवारी एलआयसीचे शेअर्स ९०१ रुपयांवर उघडले. याच्या २ टक्के वाढीसह शेअर्स ९१५ रुपयांवर पोहोचले आहेत.