Messi Goat tour
Sakal
Leonel Messi India Tour Fees : मागच्याच आठवड्यात जगप्रसिद्ध फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सीचा भारत दौरा झाला. तब्बल चौदा वर्षानंतर आणि वर्ल्डकप जिंकल्यानंतर मेस्सी पहिल्यांदाच भारतात आल्याने त्याच्या दौरा मोठ्या चर्चेत राहिला. 'India GOAT Tour 2025' अंतर्गत तो तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आला होता. या दौऱ्यात त्याने सर्वप्रथम कोलकात्याला भेट दिली. त्यानंतर तो हैदराबाद, मुंबई आणि अखेरीस दिल्ली येथे गेला. या दरम्यान मेस्सी अनेक नामवंत व्यक्तींना भेटला.