Rules changes from March 1 : एलपीजी, यूपीआय ते रेल्वे तिकीट बुकिंगपर्यंत १ मार्चपासून होताय मोठे बदल!

New rules effective from March 1: जाणून घ्या, नेमके काय बदल होणार आहेत आणि त्याचा काय परिणाम होईल?
New rules effective from March 1 bring significant updates in LPG cylinder prices, UPI digital payments, and railway ticket booking procedures across India.

New rules effective from March 1 bring significant updates in LPG cylinder prices, UPI digital payments, and railway ticket booking procedures across India.

esakal

Updated on

March 1 new rules India : दर महिन्याच्या सुरुवातीस काही आर्थिक बदल होत असतात, ज्याचा सर्वसामान्यांच्या मासिक खर्चावर परिणाम होत असतो. आता १ मार्चपासूनही एलपीजी, यूपीआय ते रेल्वे तिकीट बुकींगपर्यंत काही बदल होणार आहेत. याशिवाय सीएनजीच्या किमतीतही बदल दिसून येणार आहेत. जाणून घेऊया मार्च २०२६ पासून नेमके कोणते नियम बदल होत आहेत. 

एलपीजी गॅस सिलिंडर -

दरमहा एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमती बदलतात. गेल्या काही महिन्यांत, फक्त व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत बदल दिसून आला आहे. सध्या, स्वयंपाकाच्या गॅसच्या किमती स्थिर आहेत. गेल्या महिन्यात, १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत अंदाजे ४९ रुपयांनी वाढ झाली होती. या महिन्यातही बदल होण्याची शक्यता आहे.

सिम बाइंडिंग नियम -

डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी, सरकार १ मार्चपासून सिम बाइंडिंग नियम लागू करत आहे. या नियमानुसार, UPI प्रमाणेच WhatsApp, Telegram आणि Signal सारखे अॅप्स तुमच्या सिम कार्डशी जोडले जातील. तुमच्या फोनमधून सिम काढून टाकल्यानंतर हे अॅप्स काम करणे थांबवतील.

New rules effective from March 1 bring significant updates in LPG cylinder prices, UPI digital payments, and railway ticket booking procedures across India.
Mount Abu Name Change : जगप्रसिद्ध 'माउंट अबू'सह तीन शहरांचे नामांतर; मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांची मोठी घोषणा

UPI पेमेंट्स -

१ मार्चपासून UPI ​​पेमेंटमध्येही बदल दिसू शकतात. नवीन नियमांनुसार, मोठ्या रकमेचे ऑनलाइन ट्रान्सफर आता केवळ UPI पिनद्वारे शक्य होणार नाही. जास्त रकमेच्या बँक व्यवहारांसाठी अतिरिक्त बायोमेट्रिक्स किंवा मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन अनिवार्य असेल.

New rules effective from March 1 bring significant updates in LPG cylinder prices, UPI digital payments, and railway ticket booking procedures across India.
Swami Avimukteshwaranand : स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांना मोठा दिलासा; अलाहाबाद उच्च न्यायालयाने अटक स्थगित केली

रेल्वे तिकिटे -

मार्च २०२६ मध्ये जनरल आणि प्लॅटफॉर्म तिकिटे बुक करण्याचे नियम बदलण्याची शक्यता आहे. भारतीय रेल्वे तिकीट बुकिंगसाठी एक नवीन RailOne अॅप लाँच करू शकते. प्रवाशांना या नवीन अॅपवर जनरल तिकिटे, प्लॅटफॉर्म तिकिटे आणि स्थानिक प्रवासाशी संबंधित सर्व माहिती सहज मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com