

Mahatma Gandhi Simple Clothing
esakal
सुधीर जोगळेकर - sumajo51@gmail.com
पंचे आणि साधेपणा, पंचे आणि महात्मा गांधी ही जणू समीकरणंच. महात्माजींच्या साधेपणाचं प्रतीक ठरलेल्या या वस्त्रापासून प्रेरणा घेऊन त्याच्या विक्रीचा व्यवसाय सुरू करणारी आणि तो विकसित, विस्तारत त्या व्यवसायाचं शतक पूर्ण करणारी पुणे आणि मुंबईतील दोन दुकानं म्हणजे पुण्यातलं ‘गोरे आणि मंडळी’ आणि सुरुवातीला गिरगावात, पण आता दादरमध्ये स्थिरावलेलं ‘गिरगाव पंचे डेपो.’ आता त्यांची चौथी-पाचवी पिढी हा व्यवसाय पुढे नेत आहे. त्यांच्या या वाटचालीविषयी...
भारतातील बहुसंख्य जनता अंगावर पुरेसे कपडे नसलेली आणि गरिबीत जगणारी होती. तिला स्वातंत्र्य आंदोलनाशी जोडून घ्यायचं असेल, तर तिच्याचसारखा सामान्य वेष असला पाहिजे. भारतीय गरीब जनतेशी एकरूप व्हायचं असेल, स्वदेशीचा प्रचार करायचा असेल, तर साधेपणाचं प्रतीक म्हणून साधा पेहराव आयुष्यभर अंगावर चढवला पाहिजे, असं महात्माजींना वाटत होतं. किंबहुना, त्यांच्या त्या साधेपणानंच स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली होती. सर्वसामान्य भारतीयाला ते आंदोलन आपलं आहे, असं वाटायला लागलं होतं.