Mahindra Manulife Focused Fund
sakal
- वसंत कुलकर्णी, ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
महिंद्रा मनुलाइफ फोकस्ड फंड येत्या शनिवारी (ता. १) पाच वर्षे पूर्ण करून सहाव्या वर्षात पदार्पण करीत आहे. या फंड गटातील बहुतेक फंड लार्ज-कॅप केंद्रित असले, तरीही त्यांनी विस्तृत बाजारपेठेच्या सापेक्ष चांगला परतावा मिळवला आहे. लार्ज-कॅप केंद्रित फंड (फोकस्ड आणि फ्लेक्सिकॅप) जोखीम आघाडीवर अधिक सक्षम असतात.